एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती

महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांची पंजाबचे प्रभारी नेमले गेले आहेत.  त्यांच्या सोबतीला दोन सहप्रभारी पंजाबमधली सत्ता राखणं काँग्रेससमोरचं मोठे आव्हान असणार आहे

परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु

गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसा पत्रव्यवहार सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयासोबत सुरु केला आहे. ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी ही नोटिस बजावण्यात येणार आहे. 

सावंतवाडी नगरपरीषदेची सभेत सेना-भाजप नगरसेवकां मध्ये बाचाबाची

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. जिओ केबल टाकण्यासाठी शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

तुळजापूरात रोज सव्वा लाख भाविक

नवरात्रीशिवाय होणार्यी गर्दीचे तुळजाभवानी मंदिरात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज सव्वालाख भाविकांचे दर्शन घेत आहेत. कोरोना आपत्कालीन परिस्थिती निवळल्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. मागील आठ दहा दिवसांपासून दीपावलीच्या सुट्ट्या आणि कोरोना नंतरचे दर्शन घेण्याची भाविकांची आतुरता या दोन्ही बाबीमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज दर्शनासाठी सव्वा लाख भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि पारंपारिक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. 

21:19 PM (IST)  •  12 Nov 2021

तब्बल वीस महिन्यांच्या गॅपनंतर रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होणार

रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. तब्बल वीस महिन्यांच्या गॅपनंतर रेल्वे पुन्हा सुरळीत वेळापत्रकाप्रमाणे  सुरू होणार आहे

20:47 PM (IST)  •  12 Nov 2021

राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे   कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

14:39 PM (IST)  •  12 Nov 2021

ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाही

ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाही

ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

ऋषिकेश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा

मनी लााँड्रिंग  प्रकरणी ऋषिकेश यांनाही ईडीतर्फे चौकशीसाठी सम्मन्स 

मात्र हजर होण्याऐवजी ऋषिकेशतर्फे मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

13:33 PM (IST)  •  12 Nov 2021

अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश

अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश

12:46 PM (IST)  •  12 Nov 2021

ईडीनं पुढील चौकशीसाठी देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली

ईडीनं पुढील चौकशीसाठी देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली, ईडी कस्टडीला विरोध करत अनिल देशमुखांच्यावतीनं युक्तिवाद सुरु

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget