Maharashtra Breaking News LIVE Updates: 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्या केली आहे. आगारातील गहिनाथ गायकवाड या चालकाने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. गेल्या काही दिवसांपासून सूरु असलेल्या एसटी आंदोलनातही गायकवाडांचा सहभाग होता. गहिनाथ गायकवाड मूळचे बीडचे रहिवाशी असून त्यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.
एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा; 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय
मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळानं हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यानं आता एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळानं 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे.
देशवासियांना संबोधित करताना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत." असं मोदींनी म्हटलं आहे.
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहे. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
तोडगा नाही, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक संपली
मागील एक तासापासून सुरू असलेली बैठक संपली. बैठकीत तूर्तास तरी काहीच तोडगा नाही. कर्मचारी मात्र संपावर ठाम आहे. अनिल परब यांच्याकडून सरकार विलीनीकरणाबाबत पॉझिटिव्ह असल्याबाबतचे संकेत दिले आहे. लवकरच पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या अमरावती दौरा करणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या अमरावती येथे दौरा करणार आहेत. त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात अमरावतीत हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्वाचा आहे. फडणवीस उद्या स्थनिक नागरिक, लोक्रतिनिधींसह पोलिस अधिकारी यांच्या सोबत चर्चा करतील.
आझाद मैदानावरील संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढण्यावर ठाम
आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून संप सुरु असून मोर्चेकरी आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावह मोर्चा धडकणार आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल ऑफिस येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक होणार आहे. बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर उपस्थित राहणार आहे. कर्मचारी संघटना अजूनही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहे. बैठकीसाठी सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण नाही. एसटी महामंडळाकडून सुरुवातीला संपाची नोटीस देणाऱ्या एसटी कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे,