Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर जिल्ह्यात पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
1. महाराष्ट्र मास्कमुक्त करता येईल का याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं, मास्कमुक्त झालेल्या देशातल्या परिस्थितीचा अभ्यास करणार, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतरच निर्णय घेणार
2. सरकारी नोकरीतल्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार, सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याच्या शासनआदेशाला याचिकाकर्त्यांचा विरोध
3. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, 29, 30 जानेवारी आणि 5, 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर म्हाडाच्या परीक्षांच्या वेळापत्रकातही पुन्हा बदल
4. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा होण्याची शक्यता, डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
5. लवकरच सुपरमार्केटमध्ये वाईनची बाटली मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
6. मित्राच्या मृत्यूनंतर आठ ते दहा जणांकडून रुग्णालयात तोडफोड,नागपूरमधील धक्कादायक घटना, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
7. राज्यात गुरुवारी 25 हजार 425 कोरोनाबाधितांची नोंद तर 42 जणांचा मृत्यू, ओमायक्रॉनच्या 72 रुग्णांची नोंद
8. पोलीस विभागामार्फत नागरिकांना एका OTP द्वारे घरबसल्या मिळणार लोकसेवांची माहिती, राज्यात प्रथमच पोलीस विभागाकडून सुविधा
9. राहुल गांधींसमोर मुख्यमंत्री चन्नी यांची सिद्धूंना 'जादू की झप्पी'; राहुल गांधींना म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांना मिठी मारली. आमच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यांच्या निर्णयामागे आम्ही सर्वजण उभे राहू असंही ते म्हणाले. त्यामुळे किमान राहुल गांधींच्या समोर तरी या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून आलं. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "मला कोणत्याही पदाची आशा नाही. राहुल गांधींनी योग्य व्यक्तीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्याच्यामागे आम्ही सर्वजण एकदिलाने उभे राहू. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. आपल्यात आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्याच कोणताही वाद नाही."
10. एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येणार, दीपमच्या सचिवांची माहिती, आयपीओतून एक लाख कोटीपर्यंतचा फंड सरकार उभारणार
कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, शर्यतीसाठी हजारोची गर्दी
डोंबिवली जवळील कल्याण शीळ मार्गावरील पडले-देसाई गावात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी रोजी जत्रा आयोजित करन्यात आली होती .या जत्रेच्या आडून हजारोंची गर्दी जमवत गावातील माळरानावर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. एवढी मोठी जत्रा गावात भरली असताना पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळाली नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.तर या शर्यतीचे व्हीडिओ व्हायरल झाले असून डायघर पोलिसांनी आयोजक पाच जनांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी जत्रेची माहिती मिळाली मात्र घटना स्थळी जाईपर्यंत शर्यती संपल्या होत्या या प्रकरणी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
राज्यात लवकरच 7200 पोलीसांची भरती होणार- दिलीप वळसे पाटील
राज्यात लवकरच 7200 पोलीसांची भरती होणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर येथे दिली आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
राज्यात 5200 पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे...
5200 उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल...
पुढच्या टप्प्यात 7200 पोलीस भरती संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे...
लवकरच पुढच्या टप्प्यातील प्रक्रिया घेतली जाईल...
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती....
अहमदनगर पोलिसांची ई- टपाल प्रणालीचे केले कौतुक...
ई- टपाल प्रणालीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ...
आम्ही कोर्टातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई ही लढू - चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रीस दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई ही लढू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि शेतकऱ्यांच्याच पोराला ती दारू पाजायची असं सरकारचे धोरण आहे. महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी वाईन विक्रीच्य निर्णयाबरोबरच खूप कारणे आहेत, असेही पाटील म्हणाले.
पालघर जिल्ह्यात पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू
पालघर जिल्ह्यात पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारी पासून तर पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा 7 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत
कुडाळ नगरपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का
कुडाळ नगरपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का
काँगेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी काँगेसच्या विचारांशी तडजोड करून कुणासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं
त्यामुळे कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात