Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारची जवळपास दहा जणांना धडक, तीन गंभीर
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
73th Republic Day Parade : 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाय लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत. राजपथावरील संचलनाबाबत वाचा सविस्तर.
ध्वजारोहणानंतर हवाई दलाचे चार हेलिकॉप्टर राजपथवरील आकाशात झेपावतील. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर परेड कमांडर लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा राजपथवर पोहोचतील. परेडचे सेकंड इन कमांड मेजर जनरल आलोक कक्कर यांच्या आगमनानंतर परेडची विधिवत सुरुवात होईल. या वर्षीपासून परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी 10 वाजता सुरू व्हायची. मात्र, हवामानामुळे परेड अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील. यानंतर लष्कराचे 61 घोडदळाचे तुकडी दाखल होईल.
भारतीय लष्कराचा यांत्रिकी ताफा
यंदाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसणार आहेच शिवाय 1971च्या युद्धात पाकिस्तानची दैना करणारे विंटेज रणगाडे आणि तोफांचे दर्शन घडणार आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवणारे PT-76 आणि सेंच्युरियन रणगाडे राजपथावरील परेडमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतील. हा विंटेज टँक आता लष्कराच्या युद्ध ताफ्याचा भाग नाही आणि त्याला खास संग्रहालयातून परेडसाठी बोलावण्यात आले आहे. नुकतेच देशात 1971 च्या युद्धाचे सुवर्ण विजय वर्ष साजरे झाले. याशिवाय 75/24 विंटेज तोफ आणि टोपाक आर्मर्ड पर्सनल कॅरियर व्हेईकल देखील परेडचा भाग असेल. 75/24 तोफ ही भारताची पहिली स्वदेशी तोफ होती आणि तिने 1965 आणि 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. यासह आकाशात हेलिकॉप्टरचे डायमंड फॉर्मेशन दिसेल.
पुण्यातील कात्रज जवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
पुण्यातील कात्रज जवळ असलेल्या बोगद्याजवळ पुन्हा अपघात झाला असून या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडीच्या दरीपूलजवळ हा अपघात झाला असून या अपघातात कंटेनर आणि चारचाकी गाडी एकमेकाला धडकले आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती. बुझवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, कंटेनर चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि. याचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यपालांकडे धाव
मुंबई गुन्हे शाखेनं दोन हजार रुपयांच्या २५ हजार बनावट नोटा केल्या जप्त
मुंबई गुन्हे शाखेनं दोन हजार रुपयांच्या २५ हजार बनावट नोटा केल्या जप्त. सात कोटी रुपये इतकी नोटांची किंमत
पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारची जवळपास दहा जणांना धडक, तीन गंभीर
पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारने जवळपास दहा जणांना उडविले असून पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर बोईसर मधील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
मुंबईत पाच मजली बिल्डिंग कोसळली, पाच लोक अडकल्याची भीती
मुंबईतील वांद्रे येथील बेहराम नगरमधील पाच मजली इमारत कोसळली असून त्यामध्ये पाच जण अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि सहा अॅम्ब्युलन्स पोहोचल्या आहेत.