Maharashtra Breaking News LIVE Updates : अखेर कलीचरण महराजाला जामीन मंजूर
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Omicron Variant : ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष नको, गांभीर्यानं घ्या; WHO चा इशारा
Omicron Variant : भारतात कोरोनाची त्सुनामी सुरु झाली आहे. तर जगभरातल्या अनेक देशांत ओमायक्रॉनची अशी लाट आधीच आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडनॉम घेबियस यांनी गुरुवारी म्हटलं की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर आहे. विशेषतः लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांसाठी हा कमी गंभीर ठरतो. पण तरीही ओमायक्रॉनला सौम्य समजणं चूक असेल.
Kolhapur : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, एका कैद्याचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात (Kolhapur Kalamba Jail) सातत्यानं काही ना काही घडत असतं. आता कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. निशिकांत बाबुराव कांबळे असं हाणामारीत मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे. मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार निशिकांत आणि चार कैद्यांमधील वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारीत निशिकांतला बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, सध्याचे दर काय?
Petrol-Diesel Price Today, 7th January 2022 : देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर भारतीय तेल (IOCL) कंपन्यांनी जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.
नागपूरात 698 नवे कोरोनाबाधित
नागपूर जिल्ह्यात 698 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 132 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 16 झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एक हजार कोरोना रुग्णांनी नोंद
पिंपरी चिंचवडमध्ये आज तब्बल एक हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. बऱ्याच महिन्यानंतर कोरोनाने एक हजार रुग्णांचा आकडा पार केला. या आठवड्यात झपाट्याने आकडा वाढू लागल्याने, सध्या शहरात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 3135 वर पोहचला आहे.
अखेर कलीचरण महराजाला जामीन मंजूर
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कालीचरण महाराजाला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.२५००० हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत आलेल्या प्रसिद्ध कलीचरण महराजाला पुणे पोलीसांनी काल ताब्यात घेतलं होत. काल कोर्टात हजर केल्यानंतर कलीचरण महराजाला परवा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल एक दिवसाची पोलीस कोठीडी संपल्यानंतर कलीचरण महराजाला काल पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होत. त्यात कलीचरण महाराजाला अगोदर ७ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्या नंतर lagechah वकिलांनी जामीनासाठी अर्ज माननीय न्यालयाकडे केला होता त्यानुसार आज कलीचरण महराजाला पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सांगलीतील पहिली ते आठवी शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी पर्यतच्या शाळा 10 जानेवारी पासून बंद करण्याचा निर्णय सांगली जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यत शाळा बंद राहणार आहेत. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम सुरू असल्याने या दोन वर्गाच्या शाळा सुरू राहतील.
नाशिकमध्ये 837 नवे कोरोनाबाधित
नाशिक जिल्ह्यात आज 837 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 138 रुग्ण बरे झाले आहेत.