एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पुढील 4, 5 दिवसात पावसाची शक्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पुढील 4, 5 दिवसात पावसाची शक्यता

Background

यवतमाळमध्ये 'मिळून साऱ्या जणी'; लोहारा पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती

महिला सक्षमीकरणाबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे. 

सन 2015 साली स्थापन झालेल्या लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात साधारण 60 हजार लोकसंख्या आहे. या सर्वांसाठी लोहारा पोलीस ठाण्यात महिला आणि पुरुष मिळून साधारण 50 कर्मचारी कार्यरत होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही पुरुषांपेक्षाही जास्त चांगले काम करून दाखवू असा विश्वास महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. 

रुग्णसेवा देणारे डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात, 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या विळख्यात राज्यातील निवासी डॉक्टरही सापडले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक सायन रुग्णालयातील निवासी  डॉक्टरबाधित झाले  आहे. तब्बल  80 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.  

जे.जे. रुग्णालयात आत्तापर्यंत 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नायर रुग्णालयात 40,  केईएममध्ये 40 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय. काही जणांना डिस्चार्ज मिळाला असला तरी अद्याप विलगीकरणात आहे. नायर रुग्णालय 45, केईएम 60, ठाणे 8, धुळे 8, कुपर 7, पुण्यातील ससून रुग्णालय 5, मिरज 2, लातूर, औरंगाबाद, नागपूर  येथील प्रत्येकी एका निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.  मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होत असल्याने पुढील पाच ते सहा दिवस जिकरीचे  ठरणार आहे.  कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे. 

22:01 PM (IST)  •  06 Jan 2022

राज्यात पुढील 4, 5 दिवसात पावसाची शक्यता

IMD च्या पुर्वानुमानानुसार, राज्यात पुढचे 4,5 दिवसात काही ठिकाणी हलका व काही ठिकाणी गडगडाटासह पाउस.. विदर्भात तुरळक ठिकाणी 9 ता. गारपीटीची शक्यता.

21:49 PM (IST)  •  06 Jan 2022

नांदेड जिल्ह्यात धडकी वाढवणारी कोरोना रुग्णवाढ, दिवसभरात 45 बाधित तर 3 ओमीक्रोन बाधित रुग्ण

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दररोज कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 2 किंवा चार अशी होती. दरम्यान आज ह्या कोरोना रुग्णवाढीने अचानक उसळी घेत धडकी भरवणारा आकडा गाठलाय. कारण आज प्राप्त झालेल्या 1 हजार 32 अहवालापैकी 45 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. तर जिल्ह्यात नवीन व्हेरियंट ओमीक्रोनचे 3 बाधित रुग्ण आढळले आहेत. आजवर जिल्ह्यात  एकुण बाधितांची संख्या 90 हजार 646 एवढी झाली असून यातील 87 हजार 888 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 103 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आज पर्यंत बाधित मृत संख्या 2 हजार 655 एवढी आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाने आवाहन जरी केले असले तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी मात्र शून्य आहे. कारण जिल्हाभरात 144 कलम लागू असताना बाजारपेठेत,मॉल मध्ये, चित्रपटगृह,लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्या जात आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून नियम फक्त कागद काळे करण्यासाठीच वापरले जात आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केल्यास ह्या वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवता येईल.

21:18 PM (IST)  •  06 Jan 2022

मालेगाव शहर आणि परिसरात पाऊस

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजा नुसार आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर आणि परिसरात काही वेळा साठी जोरदार पावसाची हजेरी लावली,अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली तर मालेगाव शहरातील काही ठिकाणी महानगरपालिकेने टाकलेल्या गतारावरील झाकणे पावसाने रात्रीला दिसू न शकल्याने वाहन धारकांची मोठी पंचाईत झाली.

20:59 PM (IST)  •  06 Jan 2022

भिवंडी तालुक्यातील मोजे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीमधील इंडियन कॉर्पोरेशन येथील मोजे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. सोक्सको या कंपनी भीषण आग लागली असून गोदामातील  मोजे व मशीन जळून खाक झाले आहे.  आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ठाणे, भिवंडी येथील तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. 

20:37 PM (IST)  •  06 Jan 2022

राज्यात सोन्या-चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ किंवा कमी करण्यासाठी समिती गठीत

राज्यात सोन्या-चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ किंवा कमी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.  वित्त विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.  मुद्रांक शुल्क माफ किंवा कमी केल्यास महसुलावर काय परिणाम होईल तसेच या व्यावसायिकांना काय फायदा होईल याचा अभ्यास समिती करणार आहे. सध्या आयातीवर 0.1 टक्के कर आकारला जातो. समिती अभ्यास करुन एका महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget