(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sindhutai Sapkal : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sakpal Passes Away) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
Maharashtra Coronavirus Lockdown Update : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर आणि लावण्यात येणाऱ्या निर्बंधांवर आज सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवण्यात येईल. त्यानंतरच मुख्यमंत्री राज्यात कठोर निर्बंध जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने चाललं आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण
काल खोकला जाणवत असल्याने केली होती चाचणी आज रिपोर्ट पॉझिटीव्ह आला
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.