Maharashtra Breaking News LIVE Updates : धारावीत आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana)च्या रोखठोक (Rokhthok) कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की, महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
खासदार राऊत यांनी लिहिलं आहे की, 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.
गांधी घराण्याच्या साहसाचं केलं कौतुक
राऊत पुढं लिहितात, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
2 जानेवारी पासून रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
आर. एन. सिंग यांचे निधन
उत्तर भारतीय संघाचे (मुंबई) अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषद सदस्य आर. एन. सिंग (BJP MLC R N Singh) यांचे शनिवारी गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.मुंबईतील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतीय संघाचे (Uttar Bharatiya Sangh) ते सातव्यांदा अध्यक्ष झाले होते. ८ जुलै २०१६ मध्ये ते भाजपच्या (BJP) तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. ७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ रोजी संपणार होता.
कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी दोन डोस आणि आर टी पी सी आर आवश्यक,मुख्यमंत्री बोम्माई
सांगलीत ओमायक्रोनचे 2 रुग्ण
सांगलीतील 100 फुटी रोडवर गुलाब कॉलनीत वास्तव्यास असलेले दोनजण ओमायक्रोनबाधित असल्याचा रिपोर्ट प्रशासनाला मिळाला आहे. दोघेही पती-पत्नी असून त्यांनी परदेशी प्रवासही न करता त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, सध्या कोणताही जास्त त्रास नसल्याचे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सागितले आहे.
मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजला प्रवेश नाकारला
मुंबईतून 30 डिसेंबर रोजी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजला प्रवेश नाकारला होता. या क्रूजवरील काहींना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. या क्रूजवर जवळपास 2 हजार प्रवासी होते.
धारावीत आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
धारावीत आज 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. धारावीत सध्या 179 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिलीय.