Maharashtra Breaking News LIVE Updates : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात एकाला अटक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates :
सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती
नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 84 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496772 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 824 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3869 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आले चार प्रवासी, त्यातील एक प्रवासी पॉझिटिव्ह
पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक
कापूस सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक. बुलढाणा शहर पोलोसांनी थोड्या वेळापूर्वी केली अटक. रविकांत तुपकर , त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर व इतर पाच जणांना केली अटक. दुपारी सर्वाना न्यायालयात केले जाणार हजर. अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास जावे लागणार कारागृहात.
या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात - महापौर मुरलीधर मोहोळ
तीन पक्षाच्या राज्य सरकार मध्ये विसंवाद . अजित पवारांचा निर्णय राज्य सरकारने ने बदलला. नाट्यगृह ,सिनेमागृह पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता. मात्र त्याच दिवशी राज्य सरकारने अजित पवारांचा निर्णय डावलून 50 टक्के क्षमता ठेवण्याचा निर्णय घेतला. असं सारखं होतंय ,या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात, शाळा सुरू करण्याबाबत ही संभ्रम, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्या बैठका घेऊन निर्णय घेऊ असं पुण्याची महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात एकाला अटक
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने औरंगाबादमधून विजय प्रल्हाद मुराडेला अटक केलीय. आरोग्य विभागाच्या 31 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता झालेल्या परीक्षेचा पेपर सकाळी 8.36 वाजताच विजय मुराडेला मिळाला होता. विजय मुराडेकडून हा पेपर इतरांना फॉरवर्ड करण्यात आला होता. विजय मुराडे हा औरंगाबादमधे तरुणांना वेगवेगळ्या कार्यालयांमधे नोकरी लावून देतो असं सांगून एजंट म्हणून काम करत होता. पोलीसांच्या भितीने औरंगाबादमधील एका हॉटेलमधे लपून बसलेल्या विजय मुराडेला पोलीसांनी सापळा रचून अटक केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आत्मनिर्भर भारतच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर गुजरातचा नारा देत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल महाराष्ट्रात येणार आहे. मुंबईत एका रोडशोचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या जोरदार स्वागतानंतर महाविकास आघाडी गुजरात मुख्यमंत्र्यांचही असच स्वागत करणार का याकडे सर्वांच लक्ष आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. न.चि. अपामार्जने यांचं वृद्धापकाळाने निधन
राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. न.चि. अपामार्जने यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी कीर्तन क्षेत्रात सेवा दिली. इतकंच नाही तर कीर्तन विद्यालय सुरू करून कीर्तनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत अविरत पणे पोहोचवला. आहे देशभरात त्यांच्या कीर्तनाचा चाहता वर्ग होता. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मूल आणि एक मुलगी आहे. ते देखील कीर्तनाचा वारसा पुढे नेत आहेत.
नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर
महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं- रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं ही मागणी यावेळी त्यांनी अमित शाहांकडे केली
सोबतच उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये भाजपनं आरपीआयला सोबत घ्यावं. किमान 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. राज्यसभेतल्या खासदारांचं निलंबन योग्यच. खरंतर 33 खासदारांचं निलंबन व्हायला हवं होतं, जे गोंधळ घालत होते, पण सरकारनं 12 च खासदारांचं केलं. सलग तीन दिवस सभागृहात गोंधळ घातला की चौथ्या दिवशी थेट वर्षभरासाठी निलंबित असा नियमच बनवायला हवा