Maharashtra Breaking News 8 August 2022 : शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना नोटीस, लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
आजपासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना कोणाची अशी लढाई निवडणूक आयोगापुढे सुरू होणार आहे. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची वेळ मिळाली होती.
संजय राऊतांना जेल मिळणार की बेल?
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊता ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.
राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसाठी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुख्यमंत्री नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. मागचे तीन आठवडे महागाई आणि ईडी कारवाई विरोधात दोन्ही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना नोटीस, लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटीसीमधून न्यायालायने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
पुणे- लोणावळा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
लोणावळा लोकलने म्हशीला धडक दिल्याने पुणे आणि लोणावळा या दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. साडेपाचची लोणावळा लोकल पुण्याचे दिशेने येत असताना तळेगाव-देहूरोडच्या दरम्यान रेल्वे रुळावर आलेल्या म्हशीला लोकलने धडक दिली. म्हैस रेल्वेगाडी खाली अडकल्याने प्रवाशांयाना मनस्थाप सहन करावा लागला असून एका तासानंतर म्हशीला लोकल खालून काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळं दोन्ही मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालय.
Maharashra Cabinet Expansion : भाजपकडून मंत्रिपदासाठी फायनल झालेली नावं
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजपकडून फिक्स झालेली नावं,
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा मुंबई
घरफोड्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक
घरफोड्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. 17 तोळे सोने आणि 800 ग्रॅम चांदी या टोळीकडून जप्त करण्यात आलीय. सोने, चांदीचे दागिने आणि एका गाडीसह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अक्षयसिंग जुनी (वय, 19), जितसिंग टाक (26) आणि लोकसिंग टाक (19) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. नांदेड येथील गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना याबाबत माहिती दिली आहे.
नांदेड येथील गुरुगोविंद सिंगजी विमानतळ ते एनाथ शिंदे यांच्या सभेचे ठिकाण भक्ती लॉन्स याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगमना दरम्यान खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार सुभाष साबणे यांच्यासर शिंदे संर्थकांनी त्यांचे स्वागत केले.