एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यातील बैठक संपली

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates :  राज्य मागासवर्गीय आयोगाची  पुण्यातील  बैठक संपली

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. पुण्यातल्या येरवड्यात बांधकाम सुरु असलेल्या मॉलचा स्लॅब कोसळला, लोखंडी जाळीखाली अडकून 7 मजुरांचा जागीच मृत्यू

2. असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक, ओवेसींच्या वक्तव्यामुळं नाराज झाल्यानं हल्ला केल्याचा जबाब

3. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या जामिनाचं काय होणार याकडे लक्ष, पीए राकेश परब आणि राणेंची समोरासमोर चौकशी

4. दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांचा माफीनामा, गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

5. जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले; पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

6. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द

Central Railway Jumbo Megablock: मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 100 हून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 

7.बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या उद्गाटन समारोहावर भारताचा बहिष्कार, आक्रमक पवित्रा

8. फोन पे अॅपच्या नावाखाली देशभरातील 14 ज्वेलरी शॉपसह 32 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक 
 
9'गोमूत्राचे डोस घेऊन या', TMC खासदार महुआ मोईत्रा यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, ट्वीट व्हायरल

10 ISISच्या म्होरक्यानं कुटुंबासह स्वत:ला बॉम्बनं उडवलं; अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी 'ऑपरेशन' लाईव्ह पाहिलं!

ISIS : आयएसआयएसचा  (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी  (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अल कुरेशीने त्याच्या कुटुंबासह स्वत:ला बॉम्बस्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान कुरेशीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिशनमधील सर्व अमेरिकन सैनिक सुखरूप परतले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाईव्ह पाहिले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

21:03 PM (IST)  •  04 Feb 2022

बीड जिल्ह्यात सुरू होणार आठवी ते बारावीचे वर्ग..

मागच्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग बीड जिल्ह्यात सुरू करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता येत्या 7 तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.

20:45 PM (IST)  •  04 Feb 2022

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल

वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले आणि अशोक महादेव मेंडगुदले याच्यावर केला गुन्हा दाखल

कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड

19:13 PM (IST)  •  04 Feb 2022

राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यातील बैठक संपली

ओ बी सी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीचा आधार घेत राज्य मागासवर्गीय आयोगाने अंतरिम अहवाल तयार केलाय.  हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांन सादर करण्यात येणार असून आठ तारखेला तो सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.  त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत ओ बी सी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

18:35 PM (IST)  •  04 Feb 2022

नितेश राणे यांचा आजचा मुक्काम रुग्णालयात

ओरस - भाजप आमदार नितेश राणे यांचा आजचा मुक्काम रुग्णालयात. प्रकृती अस्वस्थचे दिले होते कारण. शनिवारी दुपारी 3 वाजता जामीन अर्जावर होणार सुनावणी

18:24 PM (IST)  •  04 Feb 2022

महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पोलवर चढलेल्या मजुराचा मृत्यू  

लाईन स्टाफच्या सांगण्यावरून महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पोलवर चढलेल्या मजुराचा अचानक विद्युत प्रवाह आल्याने जागीच मृत्यू  झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठ सांगवी गावातील घटना. उमेश  तुकाराम माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget