एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 28 July 2022 : बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती घेतली, मनोहर जोशींची भेट घेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 28 July 2022 : बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती घेतली, मनोहर जोशींची भेट घेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

28th July 2022 Important Events :
जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 जुलैचे दिनविशेष.

28 जुलै : कॉमनवेल्थ गेम्स.

2022 कॉमनवेल्थ गेम्स, अधिकृतपणे XXII कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखले जातात आणि सामान्यतः बर्मिंगहॅम 2022 म्हणून ओळखले जातात, हे कॉमनवेल्थच्या सदस्यांसाठी एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे जी 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहे. लंडन 1934 आणि मँचेस्टर 2002 नंतर इंग्लंडने तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवताना 21 डिसेंबर 2017 रोजी बर्मिंगहॅमला यजमान म्हणून घोषित केले.

28 जुलै : World Hepatitis Day

हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. 

28 जुलै : आषाढी अमावस्या 

या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.

जागतिक निसर्ग संवर्धन दिन :

दरवर्षी 28 जुलै रोजी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day)’ साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येतो. 

1821 साली पेरू देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं.

1968 साली नोबल पारितोषिक विजेता रेडिओएक्टिव्हिटी आणि रेडिओकेमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हॅन(Otto Hahn) यांचे निधन.

महत्वाच्या बातम्या : 

21:08 PM (IST)  •  28 Jul 2022

सोनिया गांधी स्मृती इराणींशी उद्धटपणे वागल्या - भारती पवार

सोनिया गांधी स्मृती इराणींशी उद्धटपणे वागल्या. त्यांच्या नेत्याने चूक केल्यानंतर आम्ही त्यांच्या माफीची मागणी नाही का करणार? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा हल्लाबोल

बंगाली असल्यामुळे हिंदीत चूक झाली असं अधीर रंजन म्हणतात पण मग ही चूक काँग्रेस नेत्यांसोबत बोलताना कशी होत नाही..नेमकी आदिवासी महिलेसोबतच बोलताना चूक कशी होते भारती पवार यांचा खडा सवाल

19:47 PM (IST)  •  28 Jul 2022

NMC Elections 2022 : मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी 29  जुलै रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे सकाळी 11 वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाची सोडत काढल्यानंतर शनिवार 30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार 30 जुलै ते मंगळवार 2 ऑगस्ट या कालावधीत दुपारी 3 वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

19:40 PM (IST)  •  28 Jul 2022

Nagpur Covid Update : दिवसभरात पुन्हा अडीचशेवर कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू, 78 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु

नागपूरः कोरोनाच्या चौथ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यावर पुन्हा दररोज अडीचशेवर रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात 269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यात शहरातील 164 तर ग्रामीणमधील 105 बाधितांचा समावेश आहे. आज 247 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सोबतच आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 78 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

19:22 PM (IST)  •  28 Jul 2022

बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती घेतली, मनोहर जोशींची भेट घेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, जोशी यांना भेटून बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती त्यांच्याकडून घेतली.

17:14 PM (IST)  •  28 Jul 2022

MCA : मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सर्व्हर डाऊन, मुलांसह पालकांचा खोळंबा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सर्व्हर सकाळपासून डाऊन झालं होतं. ज्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. बराच वेळ सर्व्हरला प्रॉब्लेम आल्यामुळे एमसीए कार्यालयात व्हेरिफिकेशनसाठी पोहोचलेली मुलं आणि पालकांना दिवसभर खोळंबून रहावं लागलं. पण आता सर्व्हर पूर्वरत झालं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझाAllu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Embed widget