Maharashtra Breaking News 25 July 2022 : अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
सुप्रीम कोर्टात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब मेंशन करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे
आज द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपपतीपदाचा शपथविधी
द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण्णा त्यांना पदाची शपथ देतील. सकाळी 10.15 वाजता शपथविधी होणार आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज शिवसैनिकांचा मोर्चा
एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील मानेंच्या कोल्हापुरातील घरावर मोर्चा निघणार आहे. धैर्यशील मानेंनी त्यांच्या समर्थकांना शांततेचे केलं आवाहन केलंय. धैर्यशील माने अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत
आजही विदर्भात पावसाचा अंदाज
आज अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू
कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे. प्रगती एक्सप्रेस सकाळी 7.50 वाजता पुण्याहून रवाना होईल तर संध्याकाळी 4.25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल.
Viral Audio : विधानपरिषद आमदाराकडून नागपूर मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ? ऑडिओ व्हायरल
नागपूरः विदर्भातील एका विधानपरिषद आमदाराकडून नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ करण्यात आल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. नागपूर महानगरपालिकेतील वर्तुळात तसेच सोशल मीडियावर नावांबाबत चर्चा रंगली आहे. ऑडिओमध्ये आमदार आपल्या फंडाला 'कोणी माई का लाल हात लावू शकत नाही, असा दम त्या कर्मचाऱ्यांना देत असल्याचे समजते. मात्र या प्रकरणाची पोलिस तक्रार झाली नसल्याने आमदर आणि कर्मचाऱ्याच्या नावाबाबत दुजोरा मिळाला नाही.
Hingoli News : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन
Hingoli News : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. नाफेड प्रशासनाच्या विरोधात हे धरणे आंदोलन किसान सभेच्या वतीने आज करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडे जवळपास 7000 क्विंटल अधिक हरभऱ्याची विक्री केली आहे परंतु मागील तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना या हरभऱ्याचा मोबदला मिळालाच नाही. तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित आहे यासाठी आज किसान सभेच्या वतीने आज हे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात तीन आरोपींकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात तीन आरोपींकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आली आहे. सोमनाथपुर वार्डातू जप्त केलेल्या हत्यारांमध्ये देशी बनावटीचे पिस्टल, एक देशी कट्टा आणि एका स्टीलच्या तलवारीचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून लावजोत सिंग देवल या आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. बिहार येथून हे शस्त्र आणण्यात आल्याची राजुरा पोलिसांनी माहिती दिली असून ही शस्त्र कशासाठी आणण्यात आली याचा पोलीस तपास करताहेत.
नांदेड:धर्माबाद येथे भर पावसात जिल्हास्तरीय ज्युनियर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धांची रंगत
धर्माबाद येथे नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान 14, 16, 18 व 20 वयोगटातील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मिटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी, वॉकिंग इत्यादी खेळ प्रकाराचा समावेश होता. पावसात सुरू असणाऱ्या या स्पर्धांमध्ये धर्माबाद तालुक्यासह जिल्हाभरातील विविध तालुक्यातील 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवार
अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.