Maharashtra News Live Updates : मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 24 Sep 2022 11:47 PM
मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा सुरु आहे. तासभरापासून बंद दाराआड चर्चा सुरु आहे. 

काँग्रेस अध्यक्षपदासोबत राजस्थानमधील नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग

काँग्रेस अध्यक्षपदासोबत राजस्थानमधील नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आलाय. उद्या संध्याकाळी सात वाजता काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत याबाबत फैसला  होणार आहे. 
राजस्थानचे प्रभारी अजय माकन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आमदारांशी चर्चा होणार आहे. अशोक गहलोत यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री बनणार की सचिन पायलट यांना संधी मिळणार हे या बैठकीनंतर समजेल. 

नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच जण ठार  

नांदेड : किनवट -हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारीफाटा करंजी जवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार जाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.  

मंत्री सावंतांच्या मार्गावर ठाकरे सेनेने शिंपडले गोमूत्र

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गावर ठाकरे सेनेने गोमूत्र शिंपडले डी आय सी रोड पासून मंत्री सावंत घेत असलेल्या सभेच्या ठिकाणावरील रोडवर उस्मानाबाद शिवसेनेच्या वतीने गोमूत्र शिंपण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत आरोग्य मंत्री सावंत आमदार ज्ञानराज चौगुले आमदार भारत गोगावले यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली आंदोलन करते सभेच्या स्थळी पोहोचण्याच्या अगोदर उस्मानाबाद पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी आनंद नगर पोलिसात केली आहे

संजय पांडे चार दिवस सीबीआय कोठडीत 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आता एनएसई को लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. यापूर्वी त्यांना ईडीने अटक केली होती. सीबीआयने त्यांना कोर्टातून ताब्यात घेतले. पांडे चार दिवस सीबीआयच्या कोठडीत असतील.

वेदांत प्रकल्प गुरजातला गेल्यामुळे महाराष्ट्रात रोष; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका 

महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरूणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुण्यातील वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आदित्य ठाकरे हे आंदोलनस्थळी पोहचले असून शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत. 

केज -बीड रोडवर मोटरसायकल आणि स्कूलबसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
केज बीड रोडवर मोटरसायकल आणि बसच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

 

केज बीड रोडवर कोरेगाव जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बन्सल क्लासेसच्या स्कूलबसला एका मोटरसायकलने जोराची धडक दिली, आणि यामध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील सुनील शिंदे वय वर्ष 25 याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर भागवत पवार आणि दीपक पवार हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गुजरातमधून कांदा खरेदी पू
नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गुजरातमधून कांदा खरेदी पूर्ण झाली. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक खरेदी झाली. राज्यात 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ, चार सहकारी संस्था यांच्या माध्यमातून या कांद्याची खरेदी झाली आहे. मागील 2021 22 या वर्षाच्या तुलनेत 50 हजार टन अधिक खरेदी पूर्ण झाली. अद्याप हा कांदा बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नाही. खरेदी करून साठवलेला हा बफर स्टॉक मधील कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून किरकोळ विक्रेते पर्यंत पुरवठा केला जाणार होता. अशी घोषणा झाली होती. परंतू हा कांदा उचललाच नसल्यामुळे त्याची सड होऊन नुकसान वाढलेलं आहे.
लोअर परळमधील एका इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळला  

मुंबईतील लोअर परळ भागातील एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर अल्पवयीन  तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.एनएम जोशी मार्ग पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन  मुलीचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी या प्रकरणी  एडीआर दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.  

धुळे : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरला थेट यमराज

धुळे महानगरपालिका हद्दीमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे खड्डेमुळे झालेल्या रस्त्यांमधून प्रवास करताना धुळेकरांना बहुतांश वेळी अपघाताला देखील सामोरे जावे लागत आहे, यामुळे बहुतांश धुळेकरांचे मणक्याचे दुखणे त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघात ग्रस्त होऊन हातपाय फॅक्चर होणे अशा बहुतांश घटना रोजच घडत असल्यामुळे त्रासलेल्या धुळेकरांची व्यथा मांडण्यासाठी त्याचबरोबर धुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्यांकडे वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले आहे, यावेळी या आंदोलनादरम्यान थेट रस्त्यावरती यमराज फिरवून त्यासोबतच यमराजाचे वाहन असलेला रेडा देखील या खड्डेमय रस्त्यांवरून मनसेच्या वतीने फिरवण्यात आला आहे, यावेळी या यमराज तर्फे नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले "मला धुळे महानगरपालिकेने आपल्याला घेऊन जाण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे आवाहन करीत" रेड्यासह खड्डेमय रस्त्यांमधून फिरत असलेल्या यमराजाकडे धुळेकरांचे लक्ष वेधल्याचे बघावयास मिळाले आहे.

श्रीगोंद्यात शाळकरी मुलीवर बिबट्याचा हल्ला

श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी येथे तनुजा पुराणे या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली...लघुशंकेसाठी घराबाहेर आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला केला मात्र तिने आरडाओरड केल्याने घरचे धावून आले बिबट्याने  तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात तनुजाच्या कंबरेवर जमख झाली आहे. तिच्यावर श्रीगोंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोराचीवाडी परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे.  वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी होती आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीगोंद्याच्या रायगव्हाण भागात बिबट्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आळपणे शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

धुळे : रस्त्याच्या कडेला आढळले स्त्री जातीचे अर्भक
शिरपूर शहादा रस्त्याजवळ स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत या स्त्री जातीचे अर्भक शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून ते मृत असल्याचे घोषित केले.

 
शिवसेनिकांची अब्दुल सत्तारांसमोर घोषणाबाजी

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान पूर्णेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांना अडवून पूर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील पिकांची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना निवेदन दिले. यावेळी सत्तारांसमोर शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही काहीही बरोबर होत नसल्याचे म्हणल्यानंतर अब्दुल सत्तारांनी लाडाने त्यांचा गालगुचा घेतला आणि सर्वत्र हशा पिकल्या यानंतर अब्दुल सत्तार पुर्णा येथील मेळाव्यासाठी पुढे निघून गेले.

जळगाव : मुले चोरणाऱ्या टोळीमधील असल्याच्या संशयावरून महिलेस मारहाण, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथील घटना
मुले चोरणारी महिला समजून एका निराधार महिलेला काही जणांनी मारहाण केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीस गाव येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील सदानंद चौक परिसरात काल सायंकाळच्या सुमारास एक महिला आपला चेहरा झाकून असल्याचं बघायला मिळाले होते, काही जणांनी ही महिला मुले चोरणाऱ्या टोळीमधील असल्याचा संशय व्यक्त करीत कोणतीही शहानिशा न करता महिलेला चपलांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. महिलेला मारहाण होत असताना काही नागरिकांनी महिलेला पोलिस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी महिलेची सखोल चौकशी केली असता ही महिला खंडवा येथील असल्याचं सामोरं आले आहे. ही महिला निराधार असून गावोगाव फिरून मिळेल ते काम करून ती आपली उपजीविका भागवत असल्याचं सामोरं आले आहे. तिच्या चेहऱ्यावर जळल्याच्या खुणा असल्याने आणि त्यासाठी तिने चेहरा झाकल्याने काही महिलांना तिचा संशय बळावला आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे सामोरं आले आहे. या महिलेला पोलिसांनी शासकीय निराधार केंद्रात भरती केले आहे.
Yavatmal : अतिवृष्टीनंतर पिकावर वाणू अळीचे संकट

शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. पीक जगवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. वाणूकिडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केले. त्यानंतर मिरची पिकावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. आर्णी तालुक्यातील कोपेश्वर येथील 50 एकर शेती त्यामुळे उध्वस्त झाली आहे.या खरीप हंगामात शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहे. दुबार तिबार पेरणीनंतर शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न पडेल याची शाश्वती नाही. त्यातच विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे तूर, सोयाबीन, मिरची पिकावर गोगल गाय, वाणू अळीने आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकरी करीत आहे. मराठवाडा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली, यवतमाळ जिल्ह्यात मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Ratnagiri Shop Thief : रत्नागिरी शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ

रत्नागिरी शहरात एकामागोमाग एक गुन्हेगारी घटना घडत आहेत. भूल टाकून लुट करणे, हत्या करणे अशा घटना वाढत असतानाच काल रात्री चोरट्यांनी रत्नागिरी बाजारपेठेतील चार दुकाने फोडली आहेत. या दुकानातून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी या सर्व घटनांमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडण्यास आल्यावर दुकानदारांच्या हि गोष्ट निदर्शनास आली आहे. याबाबतची खबर पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. धमालानीचा पार येथील अनिरुद्ध ट्रेडर्स, धनजी नाका येथील नागरवाला जनरल स्टोअर्स, आठवडा बाजार येथी यश ट्रेडर्स आणि यश डीस्ट्रीब्यूटर या दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत.



 

Marathwada Sahitya Sammelan : 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची घोषणा..

जालना येथे 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली असून हे संमेलन 10 आणि 11 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे होणार आहे. या होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक अभ्यासक डॉ शेषेराव मोहिते यांची एकमताने निवड करण्यात आलीय,  संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवाजीराव चोथे यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान ही माहिती दिलीय.

काँग्रेसच्या हनुमान चालीसावर अनिल बोंडे यांचं प्रत्युत्तर
मागील दोन वर्षांपासून बंद असलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे या खासदारांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी काल काँग्रेसच्या वतीने अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभिनव आंदोलन करण्यात आले होते. यावर भाजप नेते तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमरावती जबलपुर रेल्वे एक्सप्रेस लवकरच सुरू होणार, माझं रेल्वे मंत्र्यांशी बोलणं झालं आहे. परंतु एक आनंदाची गोष्ट आहे तब्बल 75 वर्षानंतर हनुमान चालीसा म्हणावाशी वाटली, हनुमान चालीसा म्हटल्याने रेल्वे सुरू होते हा शोध काँग्रेसला लागला हे भाजपचे यश आहे. असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण पाहिजे ते पॅकेज देऊ : उदय सामंत

रत्नागिरी - धोपेश्वर रिफायनरी संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोठं विधान


धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण पाहिजे ते पॅकेज देऊ - उद्योग मंत्री उदय सामंत

 

स्थानिकांच्या शंका आम्ही नक्की दूर करू, धोपेश्वर रिफायनरीला विरोध करणारे लोक कोण आहेत हे शोधलं पाहिजे. रिफायनरी प्रकल्प आला तर घराघरात रोजगार मिळेल. एक उद्योग एक जिल्हा परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

 
Ratnagiri News : दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही, तटरक्षक दलाची माहिती, नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन

Ratnagiri News : दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही, तटरक्षक दलाची माहिती, विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाचा लाईफ क्राफ्टचा तो भाग, काल स्थानिक मच्छिमारांकडून प्रशासनाला देण्यात आली माहिती, नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन, याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून करण्यात आली होती 19 जणांची सुटका

नांदेड : अधिकाऱ्यांकडून मुलांबाळा सह पत्नीला जबर मारहाण, सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल
एका अधिकाऱ्याकडून मुलांबाळासह पत्नीला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये घराच्या दरवाज्यात उभा असणाऱ्या व्यक्ती कडून व्हिडीओत दिसणाऱ्या दोन महिलांना मारहाण होत असल्याचे दिसत आहे.दरम्यान सदर व्यक्ती ही लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,लातूर येथील RTO संजय विष्णू आडे हे आहेत. ज्यात RTO असणारे संजय आडे हे त्यांच्या पत्नीला घरात येण्यास मज्जाव करत असून त्यांनंतर पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण करत असल्याचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान नांदेड येथील सासुरवाडी असणाऱ्या आणि सध्या लातूर येथील RTO कार्यातील साहाय्यक RTO पदावर कार्यरत असलेल्या, संजय आडे यांच्या पत्नी कांचन आडे यांना ही मारहाण केल्याचे निष्पन्न झालंय. पत्नीने लातूर येथे आई आणि भावासह राहण्यासाठी गेल्या, आसता त्यांना घरात न घेता बेदम अमानुषपणे मारहाण केली आणि तेथून हाकलून दिले. त्यानंतर त्यांची पत्नी, सासू आणि मेहुणा हे RTO ऑफीसामध्ये गेले. तिथे RTO  कार्यालयातील त्यांच्या वरिष्ठांच्या कौटुंबिक प्रकरणात सामंजस्य करण्याचे संजय आडे यांना सागितले. मात्र कार्यालयातून बाहेर पडताच तुम्ही माझ्या कार्यालयात येऊन माजी अब्रू घालवली म्हणत बेदम मारहाण करत. 
Tuljapur Navratri 2022 : तुळजाभवानी मंदिराला विद्युत रोषणाई, मातेच्या छबिना चांदी वाहने अर्पण सोहळा संपन्न

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीर विद्युत रोषणाई आणि छबिना वाहन अर्पण सोहळा शुक्रवारी सांयकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई पुणे येथील देविभक्त विजय उंडाळे नितीन उंडाळे तसेचसंजय टोळगे सोमनाथ टोळगे गौरव टोळगे सौरव परिवाराने केली आहे. सलग आठव्या वर्षी ही विद्युत रोषणाई केली आहे. तसेच श्रीतुळजाभवानी मातेच्या छबिना काढण्यासाठी चांदीचे आवरण असलेले नंदी मोर गरुड हे देविजींचा छबिना काढण्यासाठी लागणारे वाहने आज देविचरणी अर्पण केले. यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीराच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आले. छबिनासाठी लागणारे नंदी गरुड मोर हे चांदीचे आवरण असणारे वाहने गदादे (पाटील)खोजे परिवार टोळगे परिवार यांनी दिले. या अर्पण सोहळ्या वेळी भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थितीत होता.

Navi Mumbai : बेकायदा वृक्षतोड केल्यामुळे एमआयडीसीचे प्रतिकात्मक श्राद्ध घालत पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

बेकायदा वृक्षतोड केल्यामुळे एमआयडीसीचे प्रतिकात्मक श्राद्ध घालत पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं आहे. रस्ता दुरुस्तीसाठी 2 हजार 800 झाडे अडथळा ठरत असल्याने या झाडांचा नाहक बळी दिला जातोय. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी याआधी अनेक आंदोलने देखील केलीत. वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता झाडांची कत्तल करण्यात येतेय. एमआयडीसीचे अधिकारी कंत्राटदाराला हाताशी धरून चोरीछूप्या पद्धतीने झाडांची कत्तल करतायत. याविरोधात पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राध्द घालून निषेध आंदोलन केले. यावेळी एमआयडीसी कार्यालयाबाहेर पर्यावरण प्रेमिनी मुंडन करून आपला निषेध व्यक्त केलाय.


Eknath Khadse : भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही : एकनाथ खडसे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या चर्चांबाबत एकनाथ खडसे यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. अमित शाह यांच्यासोबत व्यक्तिगत कारणासाठी आपण फोनवर बोलणे केले आहे आणि याबाबत आपण शरद पवार यांना ही माहिती दिली आहे. शरद पवार यांनीही आपल्यासोबत शाह यांची भेट घेण्याचं आपल्याला सांगितलं आहे. शरद पवार जर स्वतः अमित शाह यांच्याकडे माझ्यासोबत येणार आहेत. तर ते त्यांना मला भाजपमध्ये घ्या हे सांगण्यासाठी तर येणार नाही, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँगेसच्या त्याग करण्याचा आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्नच नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक काम करत नाहीत - नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांवर काम करत नसल्याची टीका केली. दक्षिण, पश्चिम नागपूर मतदार संघातील नगरसेवकांना शंभर पैकी फक्त पन्नासच गुण देता येईल असे गडकरी म्हणाले. नागपुरात आज फडणवीस यांचे "दक्षिण पश्चिम नागपूर" आणि "पश्चिम नागपूर" या दोन मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना वयोश्री योजना आणि दिव्यांग सहायता योजनेत साहित्य वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात बोलताना गडकरी म्हणाले की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना साहित्य वाटपाचे कार्यक्रम नागपूर शहराच्या सर्व विधानसभा क्षेत्रात घेतले जात असताना दक्षिण नागपूर (म्हणजेच आमदार मोहन मते यांच्या) मतदारसंघात जशा पद्धतीने नगरसेवकांनी काम केलं. ते पाहता त्यांना शंभर पैकी 90 गुण द्यावे लागतील. मात्र दक्षिण पश्चिम (म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या) मतदारसंघातील नगरसेवकांनी जे काम केले ते पाहता त्यांना शंभर पैकी फक्त 50 गुण देता येईल. विशेष म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला असून या भागातून मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून येतात. मात्र सार्वजनिक कार्यक्रमात ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते पाहता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील अनेक नगरसेवकांना पक्ष घरी बसवू शकते.

Wardha : कोटेश्वर येथे नदीकाठी दरवर्षीप्रमाणे पितृपक्षात गर्दी
Koteshwar : विदर्भातील काशी अशी ओळख असलेल्या कोटेश्वर येथे नदीकाठी दरवर्षीप्रमाणे पितृपक्षात गर्दी पाहायला मिळत आहे. शिवभक्तांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळी तालुक्यातील रोहणी (राव) येथील कोटेश्वर येथील शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या उत्तर वाहिनी नदीवर दरवर्षीप्रमाणे पितृपक्षात मोठी गर्दी बघायला मिळाली. पितरांच्या पूजेसाठी या दिवसांमध्ये कोटेश्वरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृ पंधरवड्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तरी नदीवर पूजे करिता येणाऱ्या भाविकांनी नदीत उतरताना काळजी घेणं गरजेचं आहे. अनादी काळापूर्वी प्रभू रामाचे गुरू वशिष्ठ ऋषींनी याठिकाणी एक कोटी आहुती यज्ञ केल्याने 'कोटेश्वर' असे या शिवलिंगाला नामाभिदान प्राप्त झाले. या यज्ञानंतर नदीचे पात्र अचानक बदलले आणि ती उत्तरवाहिनी झाली. अशी आख्यायिका सांगितली जाते.
Beed Tanaji Sawant : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बीड शहरात जोरदार स्वागत
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं बीड शहरामध्ये आगमन होताच सकाळ मराठा समाजाच्या आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 151 किलोचा हार घालून आणि फटाके वाजून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केल आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच तानाजी सावंत हे बीडमध्ये आले असून ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. बीडमध्ये आगमन होताच सकाळ मराठा समाज आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं क्रेनच्या सहाय्याने हार घालून आणि फटाके वाजवून स्वागत केलं आहे. यावेळी सावंत यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील चर्हाटा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढली आहे.
कौन किधर जायेगा ये वक्त बतायेगा : अब्दुल सत्तार
कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी कौन किधर जायेगा ये वक्त बतायेगा असे सूचक विधान परभणीत केले आहे. शिवाय न्यायालयाने काल शिवसेनेला दिलेल्या दिल्यानंतर आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करू असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त आज परभणीत आहेत. त्यांच्या हस्ते परभणीत विविध शाखांचे उद्घाटन केलं जातंय. शिवाय तीन ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा ही ते घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केलंय. ज्यात शेतकऱ्यांची मदत असेल त्याचप्रमाणे हायकोर्टाने दिलेला निकाल, श्रीकांत शिंदेचे खुर्ची प्रकरण आणि एकनाथ खडसे भाजपात जाणार का? आणि नाना पटोले यांनी केलेल्या काँग्रेसमध्ये भाजपचे नेते येणार असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांच्या पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत आणि यानंतरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी माहिती सत्तारांनी दिली.
Hingoli Sena Nishedh Andolan : रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन 
हिंगोलीत रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय. एका कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. याचाच निषेध आज हिंगोलीत करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत कदम यांच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
अकोला-अमरावतीदरम्यान पुलाचा स्लॅब कोसळला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अकोला-अमरावतीदरम्यान पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलीये. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरजवळील अनभोरा गावाजवळ सकाळी ही घटना घडलीये. हा मार्ग एका बाजूने बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यामुळे या मार्गावरील वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नाही. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पुल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वडगावमध्ये फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प राज्याबाहेर केल्याच्या निषेधात आंदोलन

फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत जिथे हा प्रकल्प होणार होता. त्या वडगाव मावळ तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे. संध्याकाळी चार वाजता वडगावमधील पंचायत समितीसमोर हे आंदोलन होणार असून त्यासाठी शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात झालीय. आदित्य ठाकरे वडगावचे ग्रामदैवत असलेल्या पोटोबा मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.  त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसैनिकांच मोर्चा पंचायत समितीसमोर येणार आहे. पंचायत समितीसमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे.

शिवसेनेचा आतातरी न्याय व्यवस्थेवर विश्वास बसेल : सुधीर मुनगंटीवार
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दिली. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत आतातरी शिवसेनेचा न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास बसेल, अशी आशा करूया, असं मत व्यक्त केलं. नेहमीच न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे लोक या निर्णयामुळे तरी न्यायालयावर विश्वास दाखवतील, अशी अपेक्षा करूया, असंही ते म्हणाले.
Ratnagiri Suspicious Boat Update : दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही
दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही

 

तटरक्षक दलाचा खुलासा

 

विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाचा लाईफ क्राफ्टचा तो भाग

 

काल स्थानिक मच्छिमारांकडून प्रशासनाला देण्यात आली माहिती

 

नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन

 

याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून करण्यात आली होती 19 जणांची सुटका
Mumbai Goa Expressway : तब्बल 36 तासानंतर मुंबई गोवा महामार्गाचे वाहतूक सुरळीत

तब्बल 36 तासानंतर मुंबई गोवा महामार्गाचे वाहतूक सुरळीत झाली. 22 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता एलपीजी गॅसन भरलेला टँकर लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावरून काजळी नदीत कोसळला. अपघात झाल्यानंतर लगेचच या महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली. पर्यायी मार्ग म्हणून  देवधे - पुनस - काजरघाटी - रत्नागिरी आणि शिपोशी - दाभोळे - पाली या मार्गाने वाहतूक वळवली गेली. टँकरमधून होत असलेली गॅस गळती काही प्रमाणात रोखण्यास रात्री  7 ते 8 वाजेपर्यंत यश आलं. 23 सप्टेंबरच्या रात्री 8:30 ते 9 वाजेदरम्यान अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसरा टँकर मध्ये शिफ्ट करण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री अर्थात 24 सप्टेंबरला जवळपास 2 वाजेपर्यंत गॅस काढण्याचं काम पूर्ण झालं. त्यानंतर मध्यरात्री 2.30 ते 3 या दरम्यान  मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.


 
धुळे : एकविरा देवी मंदिरात नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

खानदेशाची कुलस्वामिनी धुळे शहरातील श्री एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे गेल्या दोन वर्षांपासून नवरात्र उत्सव होत नसल्याने यंदा मंदिर प्रशासनासह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आले आहे तसेच यंदाच्या शारदे नवरात्र उत्सवात करवीर पिठाचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात घटस्थापना, कुमारीका पूजन, तसेच होम, हवन आदी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

Navratri 2022 : सोमवारपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात, तुळजाभवानी मंदिरात लगबग
कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंदिर संस्थानच्या वतीने तुळजापुरात जोरदार तयारी सुरू आहे. तुळजापूर शहरातील घाटशिळ रोड वाहनतळ येथील 20 हजार भाविक क्षमतेच्या दर्शन मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. भवानी कुंड आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात येत आहे. कुंडामध्ये एकावेळी एक हजार भाविकांच्या स्नानाची सोय होणार आहे. शहरात विविध ठिकाणी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीची बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहेत. चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी शहरातील सर्व मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्ग बॅरिकेटींग लावून बंद करण्यात आले आहेत. शहरातील सर्व वाहनतळ तसेच जुन्या बसस्थानकासमोर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांती चौक, बाबजी अड्डा, तुळजापूर खुर्द आदी ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. 
Nana Patole : भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात : काँग्रेस प्रदेशाथ्यक्ष नाना पटोले

भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाथ्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. ते अकोल्यात बोलत होते. राज्यातील सरकार स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे. सध्याचे तथाकथित नवे हिंदूहृदयसम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता पटोले यांनी केली आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होतो. तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीतही त्यांच्या मेळाव्यातून काँग्रेसवर टीकास्त्र केले जायचे. तरीही काँग्रेसने ती परंपरा कायम ठेवली होती. त्या परंपरालाही काँग्रेस त्यावेळी सहकार्य करायची. दरम्यान, आगामी पदवीधर निवडणूका महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कण्हेरी येथील हनुमान मंदिरात जाऊन अजित पवारांनी दर्शन घेतलं

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी कण्हेरी येथील हनुमान मंदिरात जाऊन अजित पवारांनी दर्शन घेतलं. हे तेच हनुमान मंदिर आहे ज्या ठिकाणी पवारांचा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढविला जातो. 6 सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन भाजपची सुरुवात केली होती. 1967 साली शरद पवारांनी आपल्या विधानसभेचा प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून याच मंदिरात केला होता. तीच परंपरा आजपर्यंत देखील कायम आहे. 6 सप्टेंबर रोजी भाजपने देखील याच मंदिरातून मिशन भाजपची सुरुवात केली आहे.. बावनकुळे यांनी दर्शन घेतल्यानंतर आता अजित पवारांनी हनुमान मंदीरात जाऊन दर्शन घेतले. अर्थात बावनकुळे आणि अजित पवारांनी काय मागितलं हे आपल्याला माहीत नाही. परंतु आता हनुमान कोणाला पावणार हे आता 2024 साली कळणार आहे. 

Nandurbar Police Suspension : विवाहीत तरुणी मृत्यू प्रकरण, पोलिसांवर निलंबनाची कारवाई

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहीत तरुणी मृत्यू प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पिडीत मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार होऊन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जे.जे रुग्णालयात पिडीताच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार शवविच्छेदन देखील पूर्ण झाले असून या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.  या प्रकरणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱयांची बदली करण्यात आली होती. मात्र नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबणाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपपोलीस निरीक्षक बी.के महाजन यांना निलंबित करण्यात आले आहेत.


तरुणीच्या मृत्युनंतर तब्बल 42 दिवस उलटून देखील तिच्या वडीलांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला होता. मुलीवर बलात्कार (Rape) होऊन तिचा खून झाला असताना पोलिसांनी केवळ आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. इतकंच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावरील अत्याचारांबाबत कोणतीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला. यावर आता अधिक तपास आणि कारवाई सुरु आहे.

रत्नागिरी :लोटे MIDC तील गोशाळा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरातील ही श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संथान गोशाळा. हरीभक्त परायण भगवान कोकरे महाराज यांच्या पुढाकाराने 2008 साली या गोशाळेची स्थापना झाली. महामार्गावर भरकटणारी गुरे, महामार्गावर अपघातात जखमी होणारी गुरे आणि तर काहींना गुरे पाळायला परवडत नाही म्हणून याठिकाणी या गोशाळेत सोडली जातात. त्यांचे पालन पोषण भगवान कोकरे हे आपल्या संथेमार्फत करतात. 2008 सालापासून ही गोशाळा चालवीत असताना कोकरे यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यात कोरोनाची दोन वर्षे पूर्णतः लॉकडाऊनमध्ये गेली. या मधल्या कालावधीत गोशाळेत असणाऱ्या हजारो गुरांना चारा आणायचा कुठून हा प्रश्न संथा चालक कोकरे यांना पडला. आपले आणि आपल्या पत्नीचे दागिने बँकेत गहाण ठेवून कसेबसे दोन वर्षे पुढे ढकलली. कोकरे हे आपल्या किर्तनातुन येणाऱ्या पैशातून या गाईंच्या चाऱ्यासाठी हातभार लावतात.


पण आता ही गोशाळा गेले काही महिन्यापासून गोशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. गेल्या दोन वर्षांत खेड तालुक्यातील गुरांची कत्तल आणि तस्करीमुळे या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आपल्या मतदारसंघात गोहत्या आणि तस्करीच्या गुन्हाचे प्रमाण वाढत असल्याने या गोशाळेवर लक्षवेधी केली. त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी या गोशाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या चौकशीही सुरु आहे.

Sheetal Mhatre : शितल म्हात्रेकडून सुप्रिया सुळेंचा फोटो ट्वीट, राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल

Supriya Sule : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्वीट करत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. हा फोटो मॉर्फ केलेला आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं याविरोधात आदिती नलावडे (Aditi Nalawde) यांनी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी आक्रमक झाल्यानंतर शितल म्हात्रे यांनी घुमजाव केलं आहे. हा फोटो खरा असल्याचा आपण कुठेही दवा केला नसल्याचे म्हात्रे यांनी म्हटलं आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Ahemadnagar Crop Loss :
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून अहमदनगरच्या गुंडेगाव परिसरात झालेल्या पावसाने ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. याचं ओढ्यांचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, सोयाबीन, कांदा, उडीद, सुर्यफुल, मुग भुईमुग, कापुस यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या पंचनाम्यातील जाचक अटी शिथिल करून, किमान नजरेला दिसणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगावात आंदोलन

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसीसमोर शिवसेनेचे आंदोलन होणार आहे. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे.

Rain Updates : मान्सून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून माघारी परतणार

मान्सून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून माघारी परतणार असल्याचा अंदाज आहे.





Delhi CBI Raid : ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई, देशातील 20 राज्यात 56 ठिकाणी सीबीआयचे छापे

Delhi CBI Raid : ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई, देशातील 20 राज्यात 56 ठिकाणी सीबीआयचे छापे, इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयची देशभरात छापेमारी... मुंबई, दिल्ली, बंगळुरुत छापे

CBI Raid : ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई, देशातील 20 राज्यात 56 ठिकाणी सीबीआयचे छापे

ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई, देशातील 20 राज्यात 56 ठिकाणी सीबीआयचे छापे





Coronavirus Updates : देशात 4912 नवीन कोरोनाबाधित

Coronavirus Cases Today :  देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकंच नाही तर देशातील नवीन कोरोना रुग्णांचा आलेखही घसरला आहे. गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारांच्या पुढे होती. आदल्या दिवशी देशात 5 हजार 383 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेनं 441 रुग्ण घटले आहेत. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Kolhapur News: कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा आढळला मोबाईल, तीन नंबर सर्कलमधील बॅरेक नंबर दोनमधील प्रकार

Kolhapur News:  कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा आढळला मोबाईल, तीन नंबर सर्कल मधील बॅरेक नंबर दोनमध्ये आढळला मोबाईल, मोबाईल बाळगल्या प्रकरणी तीन कैद्यावर जुना राजावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, विशाल माने, श्रीराम बिष्णोई आणि प्रशांत सूर्यवंशी असं गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावं

ATS Raid Live Update : पीएफआय संघटनेच्या रडारवर होते पंतप्रधान मोदी, 12 जुलैच्या पाटण्यातील रॅलीत घातपाताचा कट

पीएफआय संघटनेच्या रडारवर होते पंतप्रधान मोदी, 12 जुलैच्या पाटण्यातील रॅलीत घातपाताचा कट होता





Navneet Rana : खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी

Navneet Rana News Updates :  खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या दोघांविरोधात दोन महिन्यात दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Devendra Fadnavis on PFI : तपासामधून अनेक गोष्टी समोर येतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पीएफआय संघटनेविरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी म्हटलं आहे की, पीएफआईवर कारवाई झाली. मोठ्या प्रमाणावर त्यांच्या संदर्भातले पुरावे एनआयए, एटीएस आणि केंद्र आणि राज्य सरकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळ सरकारने पीएफआयवर बंदीची मागणी केली आहे. मला असं वाटते की तपासामधून अनेक पुरावे आणि गोष्टी समोर येतील. यांची जी कार्यपद्धती होती त्यानुसार आतल्या आत देशात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचं षडयंत्र होतं.'

Aurangabad: औरंगाबादमध्ये 'मविआचं' आंदोलन; शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

सैराट फेम प्रिन्स चौकशीसाठी राहुरीत, आर्थिक फसवणूक प्रकरणात सुरज पवारची चौकशी

सैराट फेम प्रिन्स चौकशीसाठी राहुरीत...
आर्थिक फसवणूक प्रकरणात सुरज पवारची चौकशी...
सुरज पवार काल राहुरी पोलीस ठाण्यात हजर...
मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमीष देवून पैशाची लुट प्रकरण...
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
सुरज पवारचाही सहभाग असल्याचा पोलीसांचा संशय..
15 सप्टेंबर रोजी झालाय गुन्हा दाखल..
आत्तापर्यंत चार आरोपी पोलीसांच्या ताब्यात...
काल सहा तास सुरजची कसून चौकशी..
सोमवारी सुरजला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश...
चौकशीनंतर गुन्हात सहभाग आढळ्यास होणार सुरज पवारला अटक

उस्मानाबाद : भवानी ज्योत नेणाऱ्या तरुणांचा तुळजाई नगरीत जागर, शहरात नवराञोत्सव मंडळे दाखल
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी राज्यातील सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाचे कार्यकते प्रचंड संखेने वाजत गाजत आई राजा उदोचा गजर करीत दाखल झाले आहे. भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी रवाना होत असल्याने शनिवारी तिर्थक्षेञी तरुणाईचा जागर दिसून आला. शनिवारी मंदिरात हजारो भवानी ज्योत प्रज्वलित करुन नवराञोत्सव मंडळांनी देविस्थापनेसाठी गावी रवाना झाले. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवराञोत्सव साजरा होत असल्याने यंदा सार्वजनिक नवराञोत्सव मंडळांचे कार्यकते मोठ्या संखेने घटस्थापने साठी लागणारा श्रीफळ आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी शनिवारपासून प्रचंड गर्दी केली आहे. रविवार सार्वजनिक नवराञोत्सव मंडळांची भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असल्याने तिर्थक्षेञ तुळजाई नगरीत पोलिसांनी सुरक्षायंञणा कडक केली आहे. नवराञोत्सवात घटस्थापना करण्यासाठी देवीची भोगीपूजा करुन पूजेचे श्रीफळ घटस्थापना करण्यासाठी वापरण्याची प्रथा परंपरा असल्याने नवराञोत्सव मंडळे घटस्थापनेपुर्वी मंदिरात भोगीपुजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेतात. या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरकडे येणाऱ्या चोहीबाजुंचा रस्त्यावर सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाचे कार्यकते भवानी ज्योत घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षनुवर्ष भवानी मंदुरात ज्योत प्रज्वलित करुन नेणाऱ्या मंडळाच्या संखेत प्रचंड वाढ होत आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यतचे नवराञोत्सव मंडळ तिर्थक्षेञी येत आहेत. त्यामुळे नवराञोत्सव चालु होण्यापूर्वीही प्रचंड गर्दी तुळजाई नगरीत होत आहे.
Ajit Pawar Baramati Visit : विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली.. आता अजित पवारांचा विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार सुरू आहे. बारामतीत आज अजित पवार विविध ठिकाणी भेट देऊन कामंचा शुभारंभ आणि उद्घाटन करणार आहेत. 

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा; 24 जाहरांचा दंड; विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय

पुणे : आईवडिलांच्या भांडणात मुलीला लागली बंदुकीची गोळी

आई वडिलांच्या भांडणात मुलीला बंदुकीची गोळी लागली. पुण्यातील नऱ्हे भागात काल रात्री 8 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पांडुरंग उभे (38) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, काल रात्री उभे आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायमध्ये असल्याकारणाने त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर त्यानी पत्नीवर उगारली. याच वेळी त्यातून गोळी सुटली आणि त्यांची मुलगी राजनंदिनी हिच्या छातीत लागली. तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

Pune Firing : आई-वडिलांच्या भांडणात मुलीला लागली बंदुकीची गोळी, गोळीबारात मुलगी जखमी

आई-वडिलांच्या भांडणात मुलीला लागली बंदुकीची गोळी, गोळीबारात मुलगी जखमी, पुण्यातल्या नऱ्हे परिसरातील धक्कादायक घटना





Pune Accident : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. पुढे निघालेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. ट्रॅक्टर चालकाचे मात्र त्याकडे लक्ष नव्हते. अशातच ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकीस्वार पत्नी अन् लहान बाळ खाली कोसळले. तेव्हाच ट्रॅक्टरचे मागचे चाक बाळाच्या डोक्यावरून गेले. ट्रॅक्टर चालक मात्र तसाच पुढं निघून गेला. मागे जखमी झालेल्या बाळाचा मृत्यू झाला होता.

पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली

पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाडा येथे पुन्हा एकदा गडचिंचले साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता टळली . वाडा तालुक्यातील घोडविंदे पाडा येथे एका साधूला मुलं पळवण्यासाठी आलेला चोर समजून जमावाने घेराव घातला. मात्र गावातील एका जागरूक नागरिकाने त्वरित वाडा पोलिसांसोबत संपर्क साधल्याने वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावापासून या साधूची सुखरूप सुटका केली. सुरेश किसन शिंदे वय वर्ष 50 अस या साधूंच नाव असून ते मूळचे गोवा येथील असून सध्या ते कल्याण येथे सध्या वास्तव्यास आहेत. पितृपक्षात ते गावोगावी फिरून नवनाथांचं भजन करत असल्याचं पोलीस तपासात उघड झाल आहे. मात्र सध्या पालघरच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा मुलं पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवा पसरत असून यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पालघर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 86 डॉलर प्रति बॅरलवर 

जगभरातील बॅंकांकडून व्याजदरवाढ होत असल्यानं जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 86 डॉलर प्रति बॅरलवर 


अनेक देशांकडून व्याजदर वाढ होत असल्यानं जागतिक मंदीची भीती व्यक्त 


फेडरल रिझर्व्ह, बॅंक ऑफ इंग्लंड आणि स्विझ बॅंकेकडून रेपो रेटमध्ये वाढ 


कच्च्या तेलाची मागणी घटण्याच्या भीती, ब्रेंट क्रूड ऑइल 86 डॉलर प्रति बॅरलवर तर डब्ल्यूटीआय क्रूड 79 डॉलर प्रति बॅरलवर 


मागील चार महिन्यांपासून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे 


कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होणार? 


आरबीआयकडून 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत कच्च्या तेलाच्या किंमतींवर देखील भाष्य होणार

Jalna PFI Andolan : NIA आणि ATS विरोधात निदर्शने करणाऱ्या 30 ते 40 PFI कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल
जालना येथे पीएफआय पदाधिकाऱ्याच्या अटके विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करणाऱ्या करणाऱ्या 30 ते 40  PFI कार्यकर्त्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना येथील अटक करण्यात आलेल्या आरोपी निर्दोष असल्याचे सांगत काल शहरातील मामा चौकात PFI च्या वतीने घोषणाबाजी करत निदर्शने करन्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बेकायदेशीर जमाव एकत्रित केल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nandurbar Zendu : नवरात्र उत्सवासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी, फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मळे फुलले
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडू आणि इतर फुलांचे उत्पादन घेतले जाते. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी नवरात्र उत्सव महाराष्ट्रात आणि देशभरात निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील फुले गुजरात राज्यातील मोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये जात असल्याने नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने मोठ्या प्रमाणात व्यापारी फुलं खरेदीसाठी जिल्ह्यात दाखल झाले. फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मळे फुलांनी फुलले असून रंगीबेरंगी फुलं रस्त्याने जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून जागेवर 50 ते 70 रुपये किलो दरम्यान दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा आहे.
Nandurbar Heavy Rain Crop loss : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा : आमदार आमश्या पाडवी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र अद्यापही पंचनामे झालेले नाहीत शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून दिलासा देणे महत्त्वाचे असले तरी राज्य सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत देत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. महिनाभरात नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून यात वेचणीला आलेला कापूस खराब झाला आहे, तर दुसरीकडे कापसावर लाल्या रोगांसह विविध किडींचा प्रादुर्भाव झालाय. तसेच नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत. मात्र अजूनही जिल्हा प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत नसल्याच वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नाही झाल्यास जिल्ह्यात रस्त्यावर एकाही मंत्र्याला न फिरू देण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता पाहून कृषीमंत्र्यासहित मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांनी जिल्ह्याच्या दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना कोणीही जिल्ह्यात आल्या नसल्याचा आमश्या पाडवी यांनी सांगितले.

 
Beed ATS Action : पीएफआयच्या 39 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

पीएफआयच्या विरोधात देशभरात कारवाई होत आहे मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कारवाई झाली. या कारवाईच्या विरोधामध्ये पी एफ आय च्या पदाधिकाऱ्यांनी बीड शहरातील बशीर गंज या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागात निदर्शने केले आणि जमावबंदीचा आदेश डावलला म्हणून या पदाधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये 19 एएफआयचे पदाधिकारी आणि इतर 20 असे एकूण 39 जनावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

Parbhani : रस्त्यासाठी गावकऱ्यांनी गाव काढलं विकायला, परभणीच्या पुर्णा तालुक्यातील "माहेर' वासीयांचे रस्त्याअभावी हाल 
परभणीच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे आणि यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन असं लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्यामुळे गावकऱ्यांना गाव विक्रीसाठी काढावी लागत आहेत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेरी येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या समस्येमुळे गावच विक्रीला काढले आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पाचशे लोकसंख्येचे "माहेर"हे गाव मात्र 2005 पासून या गावाला रस्ताच नाहीय. यामुळे या गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेतही जवळपास तीन किलोमीटरचा चिखल तुडवत जावं लागत आहे. शिवाय गावातील नदीवरील पूल तुटल्याने अनेक वेळेला धोक्याचा सामना करत ज्ञानार्जन करण्यासाठी जावे लागते. या रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी अनेक वेळेला आंदोलनं, धरणे आंदोलन केली मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी गाव विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने तहसीलदारांना काल निवेदन देऊन तात्काळ रस्ता करण्याची मागणी केलीये आता तरी प्रशासन या गावकऱ्यांची दखल घेईल काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.
देशात पहिल्यांदाच समुद्रातून धावणार बुलेट ट्रेन! अंडरवॉटर भुयारी मार्गासाठी निविदाही मागवल्या

देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार आहे. बुलेट ट्रेनच्या समुद्राखाली काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासाठी निविदा काढण्यात आल्यात. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान ७ किलोमीटरचा हा बोगदा समुद्राखालून जाणार आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण २१ किमीचा भुयारी मार्ग असेल. त्यातला ७ किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाईल. पारसिक टेकडीखाली ११४ मीटर खाली हा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


 

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांचा वैद्यकीय कारणासाठीचा अर्ज फेटाळला

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांचा वैद्यकीय कारणासाठीचा अर्ज फेटाळला, डोळ्याच्या ऑपरेशनसाठी  हैदराबादला जाण्याची परवावगी मागत मुंबई सत्र न्यायालयातं केला होता अर्ज. तीन महिन्यांकरिता हैदराबादमध्ये राहण्याची राव यांना हवी होती परवानगी. मात्र जामीनातील अटीनुसार राव यांना मुंबई सोडण्यास मनाई आहे. त्यामुळे वरावरा राव यांनी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं ती फेटाळून लावली आहे

जालना : PFI च्या आरोपीला आणताना, समर्थकांची घोषणाबाजी, हुसकवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

जालना येथील अटक करण्यात आलेल्या PFI चा कार्यकर्ता अब्दुल हादी अब्दुल रौफला पोलिसांनी जालना येथे त्याच्या घरी चौकशीसाठी आणलं तेव्हा PFI च्या समर्थकांनी 'NIA गो बॅक'च्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जमावाला हुसकावण्यासाठी सौम्य लाठीमार देखील केला. जालना शहरातील रहेमान गंज भागात राहणाऱ्या या आरोपीला पोलीस तपासासाठी घेऊन आली होती. त्यानंतर PFI समर्थकांनी पोलिसांसमोर घोषणाबाजी केली. यावेळी 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आलं.

Jalna News: PFI च्या आरोपीला आणताना,समर्थकांची घोषणाबाजी, हुसकवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार 

जालना येथील अटक करण्यात आलेल्या PFI चा कार्यकर्ता अब्दुल हादी अब्दुल रौफला पोलिसांनी जालना येथे त्याच्या घरी चौकशी साठी आणलं तेव्हा PFI च्या समर्थकांनी NIA गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जमावाला हुसकावण्यासाठी सौम्य लाठीमार देखील केला. जालना शहरातील रहेमान गंज भागात राहणाऱ्या या आरोपीला अचानक पोलिस तपासासाठी घेऊन आली होती. त्यानंतर PFI समर्थकांनी पोलिसांसमोर ही घोषणाबाजी केली. यावेळी 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.त्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आलं.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका... प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासह अन्य चार माजी संचालकांना 10 लाख 78 हजार भरण्याचे आदेश





Whatsapp Calling : व्हॉट्सअप, फेसबुक कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागणार?

Whatsapp Calling : व्हॉट्सअप, फेसबुक कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागणार?





डोंबिवलीत शिंदे गट आणि मनसेमध्ये ट्विटर वॉर पाठोपाठ बॅनर वॉर 

कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या रस्त्यांच्या मुद्द्यावरून चांगलंच बॅनर वॉर  रंगलाय. आधी मनसेने एक बॅनर लावत अप्रत्यक्षरित्या शिंदे गटावर निशाणा साधला होता, आता शिंदे गटाकडूनही बॅनरबाजी करत मनसेचा समाचार घेण्यात आलाय. डोंबिवली एमआयडीसीमधील रस्त्यांच्या कामाची वर्क ऑर्डर निघून दोन महिने झाले तरीही कामाला सुरुवात झालेली नाही असं सांगत, "मुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे", तसेच "कोणी मुहूर्त देता का मुहूर्त?" अशी टोलेबाजी करण्यात आली होती. हे बॅनर सोशल मीडियावरही चांगलेचं व्हायरल झाले होते. आता डोंबिवली शहारात शिंदे गटाने लावलेले बॅनर देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर" मनसेने अभ्यास करावा" असा सल्लाच शिंदेगटाकडून देण्यात आला असून मनसेचं इंजिन उलट्या बाजूने लावत मनसेला डीवचण्यात आलाय. उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा असा उल्लेख करत शिंदे गटाकडून मनसेवर तोफ डागण्यात आलीये...आता मनसे पुन्हा बॅनर लावत  उत्तर देणार  का? ते पहावं लागेल.

Beed PFI Protest : कारवाई विरोधात आंदोलन करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

पीएफआयच्या विरोधात देशभरात कारवाई होत असतानाच मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कारवाई झाली. या कारवाईच्या विरोधामध्ये पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी बीड शहरातील बशीर गंज या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागात निदर्शने केले आणि जमावबंदीचा आदेश डावलला. म्हणून या पदाधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये 19 पीएफआयचे पदाधिकारी आणि इतर 20 असे एकूण 39 जनावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

ATS Raid in Maharashtra : औरंगाबादमध्ये पीएफआयच्या अध्यक्षाला अटक, आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी

ATS Raid in Maharashtra : औरंगाबादमध्ये पीएफआयच्या अध्यक्षाला अटक, आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी






 

Mumbai Rain Update : मुंबईत सखल भागात पाणी साचायला सुरुवात

आज पहाटेपासून सूरु आसलेल्या पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मुंबई शहरात मुंबई  जोरदार तर उपनगरात हलका आणि मध्यम पाऊस बरसतोय. यामुळे मुंबई शहरातील किंग सर्कल,  दादर, सायन परिसरात सखल भागात पाणी साचत असल्याच पाहायला मिळतय. त्यामुळे वाहतूक संत गतीने सुरु आहे.

सिंधुदुर्ग : तळकोकणात देवगड हापुसला बदलत्या वातावरणामुळे मोहोर

कोकणचा फळांचा राजा हापूस आंबा खवय्यांना यावर्षी देवगड हापूसची चव जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाखता येणार आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे देवगड, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले या सागरी पट्टात हापूस आंब्यांना मोहोर आला आहे. हा मोहोर टिकवून ठेवण्याचं आव्हान आंबा बागायदारांसमोर आहे. मात्र हा मोहोर वातावरणातील बदलांमुळे म्हणजे ग्लोबल ओर्मिगमुळे झाला आहे असे मतं बागायदारांचे आहे. 

Navneet Rana : नवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. गेल्या महिनाभरात या दोघांविरुद्ध दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे.

Mumbai Rain : मुंबईत पहाटे पासून पाऊस

ठिकठिकाणी परतीचा पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासून मुंबई शहरात जोरदार तर उपनगरात हलका आणि मध्यम पाऊस बरसतो आहे. मलबार हिल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परळ, दादर परिसरात जोरदार पाऊस गेल्या तासाभरापासून पडतो आहे. जर पाऊस असाच कोसळत राहिला तर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Congress President Election : आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

Congress National President Election : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नाव चर्चेत आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत असून ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल. त्यानंतर याबाबतच चित्रं अधिक स्पष्ट होईल.  काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नावांची विशेष चर्चा आहे. यामध्ये पहिलं नाव आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत  (Ashok Gehlot) यांचं आणि दुसरं नाव आहे शशी थरुर (Shashi Tharoor) यांचं. 


सविस्तर बातमी येथे वाचा

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगावात  आंदोलन


आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसीसमोर शिवसेनेचे आंदोलन होणार आहे. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे


 आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार


 आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केले जातील. सूत्रांच्या माहितीनुसार अशोक गहलोत यांनी अर्ज दाखल केला तरी ते लगेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. दुसरीकडे शशी थरुर 30 तारखेला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.


 आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..संभाजी ब्रिगेडकडून आयोजन


 किल्ले रायगडावर द्वितीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. मंत्री दादा भुसे,  शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहे


अजित पवार बारामती आणि इंदापूरच्या दौऱ्यावर 


अजित पवार बारामती आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामतीत विविध ठिकाणी विकास कामांची पाहणी करतील. तसेच विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार होईल.. तसेच इंदापूर मध्ये अजित पवार मेडिकलचे उद्घाटन करतील.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.