Coronavirus Updates : वाढत्या कोरोना संसर्गातून दिलासा! रुग्णांची संख्या घटतेय, देशात 4912 नवीन कोरोनाबाधित
Coronavirus Cases Today in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 44 हजार 436 सक्रिय रुग्ण आहेत.
Coronavirus Cases Today in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 44 हजार 436 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकंच नाही तर देशातील नवीन कोरोना रुग्णांचा आलेखही घसरला आहे. गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारांच्या पुढे होती. आदल्या दिवशी देशात 5 हजार 383 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेनं 441 रुग्ण घटले आहेत. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग आहे.
गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू
कोरोना संसर्गाचा आलेख जरी घसरताना दिसत असला तरी कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल हा आकडा 20 वर होता. तर देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 487 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी दोन बाधितांचा मृत्यू
राज्यात शुक्रवारी 611 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, तर दोन बाधितांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी राज्यात 687 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 687 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,66,82 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के एवढे झाले आहे.
#COVID19 | India reports 4,912 fresh cases and 5,719 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 24, 2022
Active cases 44,436
Daily positivity rate 1.62% pic.twitter.com/OGzT6g01x6
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 436
देशात सध्या 44 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहेत. देशात गेल्या 24 तासांत 5,719 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 217 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
मुंबईत शुक्रवारी 106 रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 106 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 159 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,29,071 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही
महत्त्वाच्या इतर बातम्या