Maharashtra News Live Updates : मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा सुरु आहे. तासभरापासून बंद दाराआड चर्चा सुरु आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासोबत राजस्थानमधील नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग
काँग्रेस अध्यक्षपदासोबत राजस्थानमधील नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आलाय. उद्या संध्याकाळी सात वाजता काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत याबाबत फैसला होणार आहे.
राजस्थानचे प्रभारी अजय माकन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आमदारांशी चर्चा होणार आहे. अशोक गहलोत यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री बनणार की सचिन पायलट यांना संधी मिळणार हे या बैठकीनंतर समजेल.
नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच जण ठार
नांदेड : किनवट -हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारीफाटा करंजी जवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार जाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
मंत्री सावंतांच्या मार्गावर ठाकरे सेनेने शिंपडले गोमूत्र
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गावर ठाकरे सेनेने गोमूत्र शिंपडले डी आय सी रोड पासून मंत्री सावंत घेत असलेल्या सभेच्या ठिकाणावरील रोडवर उस्मानाबाद शिवसेनेच्या वतीने गोमूत्र शिंपण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत आरोग्य मंत्री सावंत आमदार ज्ञानराज चौगुले आमदार भारत गोगावले यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली आंदोलन करते सभेच्या स्थळी पोहोचण्याच्या अगोदर उस्मानाबाद पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी आनंद नगर पोलिसात केली आहे
संजय पांडे चार दिवस सीबीआय कोठडीत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आता एनएसई को लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. यापूर्वी त्यांना ईडीने अटक केली होती. सीबीआयने त्यांना कोर्टातून ताब्यात घेतले. पांडे चार दिवस सीबीआयच्या कोठडीत असतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
