एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates 19 September 2022 : एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील दिलेली स्थगिती रद्द

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates 19 September 2022 :  एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील दिलेली स्थगिती रद्द

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

पालघरमधील साधू हत्येच्या तपासाबाबत सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी 
राज्यातील १६ जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होईल.  

राज ठाकरेंचा नागपूर, चंद्रपूर दौरा  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नेतेमंडळींच्या भेटी घेणार आहेत.  
 
शरद पवार सौलापूर दौऱ्यावर 
शरद पवार यांच्या हस्ते कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये  आ. कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 

उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा
कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर  सकाळी ११ वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे.   
 
मनसेच्या वतीने कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा 
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर महामार्गावर असलेला किणी टोल नाका बंद करावा यासाठी मनसेनं लढा उभा केला आहे. आज मनसेच्या वतीने किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.  

राष्ट्रवादीचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर आंदोलन
फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून फर्ग्युसन महाविद्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे. 

23:22 PM (IST)  •  19 Sep 2022

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने केली आत्महत्या

मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली ची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या निवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्याच  नाव वैशाली विलास शेलार असून त्या
58 वर्षांच्या होत्या.

22:33 PM (IST)  •  19 Sep 2022

Accident : पालघरमध्ये मुंबई -अहमदाबाद मार्गावर अपघात, तिघे जागीच ठार तर दोन जण जखमी

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

22:01 PM (IST)  •  19 Sep 2022

MIDC : एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील दिलेली स्थगिती रद्द

MIDC :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भूखंड वाटपापैकी 183 भूखंडांची स्थगिती रद्द करण्यात आली आहे.  शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर 191 भूखंड वाटपांना  स्थगिती दिली होती. वेदांता ग्रुपचा वादग्रस्त मुद्दा ठरल्यानंतर तात्काळ अवलोकन करून निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी  निर्देश दिले होते. त्यानंतर उद्योग विभागाने या भुखंडांच पुनर्विलोकन करत 191 पैकी 183 भुखंडाची स्थगीती उठवली

20:40 PM (IST)  •  19 Sep 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या विजय माने यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्यासारखी वेशभूषा करून गेल्या काही दिवसांपासून माने हे सोशल मीडिया वर देखील चर्चेचा विषय ठरले होते. माने यांनी सराईत गुंड शरद मोहोळ याचसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी आता माने विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. माने याच्याविरोधात IPC 419-511, 469, 500, 501 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय. 

18:31 PM (IST)  •  19 Sep 2022

औरंगाबादचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार; महानगरपालिकेची माहिती

औरंगाबाद शहरास जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. दरम्यान औरंगाबाद पाणी पुरवठा 100 व 56 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी पंपगृह येथे 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 5 मिनीटांनी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे पुर्ण पंपींग बंद झाली. 100 दलली योजनेवरील नवीन जायकवाडी पंपगृह येथे मेन पॅनलमध्ये तपासणी केली असता पंप क्र. 4 च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे स्पार्कंग होऊन फेज टू फेज अर्थ फॉल्ट झाला व सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे आढळले. त्यानंतर नवीन जायकवाडी पंपगृह येथील सप्लाय बायपास करून 56 दलली योजना 4.20 वाजता सुरू करण्यात आली. 100 दलली योजना संपुर्ण काम झाल्यानंतर दुपारी 1 वाजता चालु करण्यात आली. परिणामी 56 दलली योजनेवर 2 तास 15 मिनीटे व 100 दलली योजनेवर 11 तास 5 मिनीटे खंडणकाळ झाला असल्याने सदर काळात पाणी उचल बंद होती.त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा काही कालावधीसाठी विस्कळीत होणार असल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेनी दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Embed widget