Maharashtra Breaking News 16 July 2022 : NDA कडून जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
वसईमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे मान्सून कालावधीमध्ये सुरक्षेसाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे, असं असताना, शनिवारी विकेंडला तुंगारेश्वर येथे पर्यटकांनी तोबा गर्दी केल्याच दिसून आलं होतं. विशेष म्हणजे येथे वनरक्षक विभाग पर्यटकांकडून पौढांसाठी ५३ तर लहानांसाठी २८ रुपयाची कर आकारणी ही करत होतं. पावसाळा सुरु झाल्यानंतर वसई येथील तुंगारेश्वर या प्रसिध्द पर्यटन स्थळावर अनेक वर्षापासून लाखोच्या संख्येने पर्यटन सहलीसाठी येताता. परंतु हे स्थळ आता धोकादायक बनू लागले आहेत. या धबधब्यावर अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. पोलिसांचा बंदी आदेश असताना ही येथे पोलीस बंदोबस्त नाही आहे. त्यामुळे पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. पोलीस आयुक्तालयातर्फे १४ जुलै ते २८ जुलै पर्यंत बंदी लागू असणार आहे.
उद्या आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सेमिस्टर एक आणि सेमिस्टर दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर होणार आहे. काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
जगदीप धनकड हे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.
नागपूरः जिल्ह्यात दिवसभरात 176 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील 125 आणि ग्रामीण भागातील 51 बाधितांचा समावेश आहे. सध्या शहरातील सक्रिय कोरोनाबाधित संख्या 1077 वर पोहोचली आहे. यासोबतच आज 176 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 27 कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1050 कोरोना बाधित गृहविलगीकरणात आहेत.
माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आज राजीनामा सत्र सुरु झाले आहे. शिवसेना धरणगाव शहर राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील यांनी सकाळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळवा-बांभोरी गटाचे युवासेना विभाग प्रमुख नितीन पाटील आणि युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी आपापले राजीनामे पाठवले आहेत. यानिमित्ताने धरणगाव तालुक्यात शिवसेनेला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत.अजूनही गुलाबराव पाटील समर्थक अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची चिन्हे आहेत
Tahne : ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याचा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
शिंदे गाटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज शिवसेनिकांशी सवांद साधला या वेळी बोलतांना बांगर म्हणाले, आपण शिवशिसेनीक आहोत जे कुणी आपल्याला गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याच काम माझ्या शिवसेनिकांनी कराव आम्ही भिणारे शिवसैनिक नव्हे आम्ही बाळासाहेबांचे शिवसेनीक आहोत आम्हाला कुणी का रे म्हणल तर त्याच्या काना खाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.
Nagpur : राज्याच्या उपराजधानीत संततधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून शनिवारी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळून आजूबाजूची गावे फ्लाय अॅशच्या पाण्यात बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. खसाळा राख बंध शनिवारी सकाळी कोसळे. त्यामुळे सर्व जोड रस्ते पाण्याने भरले होते. खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावे फ्लाय अॅशच्या पाण्यात बुडण्याच्या स्थितीत आहे. फ्लाय ऍशच्या पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लाखो टन राख वाहुन जात आहे. परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाले आहे. सध्या दोन जेसीबीच्या मदतीने युद्धपातळीवर गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नागपूरच्या कोराडी वीज प्रकल्पाच्या खासाळा राख तलावाचा बांध फुटला. लाखो टन राख वाहुन जात आहे. प्रदूषणाचा मोठा धोका. नदी, नाले, नलयोजनेवर परिणाम
रस्त्यावरील खड्ड्यामुळे एकही जीव जाता कामा नये अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतरही आज सकाळच्या सुमारास खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पडलेला दुचाकी स्वार बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बदलापूर पाईपलाईन रोडवरील म्हाडा प्रकल्पासमोरील रस्त्यावर घडली.बदलापूर लाईन रोड हा एम आय डी सी च्या अखत्यारीत येतो ,या पावसात खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे मात्र अद्याप रस्ते दुरुस्तीसाठी एम आय डी सी ला मुहूर्त मिळाला नाही . या अपघात प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.अंकित थैवा असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मुंबई शहरातील व राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन विकत घेवून देशातील विविध राज्यांत विक्री करणा-या टोळी विरुध्द कारवाई करुन 480 स्मार्टफोन तसेच गांजा, देशी-विदेशी दारू आणि तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त करण्यात कक्ष 6 गुन्हे शाखेस यश...
दिनांक १५/०७/२०२२ रोजी रात्रौ संशयित इसम हा खरेदी केलेल्या मोबाईलची व्हिलेवाट लावणार असल्याबाबत गोपनीय बातमीदाराकडून ठोस माहिती प्राप्त होताच मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ | मधील पोलीस पथकाने महाराष्ट्र नगर, मानखुर्द मुंबई या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून त्याचे | घरातून विविध नामांकित कंपन्याचे ४९० स्मार्ट फोन ज्यामध्ये ४१ अॅपल कंपनीच्या मोबाईल फोनचा देखील समावेश आहे. १ लॅपटॉप, हिटरमशीन, हिटरगन असे साहित्यासोबतच ९ कि. ५९० ग्रॅम वजनाचा गांजा, | देशी-विदेशी दारूच्या एकूण १७४ बाटल्या, ०२ तलवारी अशी एकूण ७४ लाख ७८ हजार ५२२ रुपये किमतीची मालमत्ता पंचात्यातंर्गत हस्तगत केली.
आरोपी इसम हा त्याचे साथीदारांसह मुंबई शहरातील तसेच राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले, | स्नॅचिंग केलेले, पिक पॉकिटींग केलेले मोबाईल विकत घेवून त्याचे आय. एम. ई आय क्रमांक बदलुन त्यास रॅपर | मध्ये पॅक करून देशातील विविध राज्यांत विक्रीकरीता पाठवितात. अशा प्रकारे कक्ष ६ पथकाने चोरीचे ४९० मोबाईल फोन म्हणजेच ४९० मोबाईल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. कक्ष ६ पथकाने एका शुल्लक माहितीचा | आभ्यास करून, मोबाईल चोरीची टोळी उध्दवस्त करून मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे समुळ उच्चाटन करून | मोबाईल चोरीच्या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करून सामान्या नागरीकांना दिलासा दिला आहे. सदर कारवाईत कक्ष ६ पथकातील पोलीस कॉन्सटेबल क्र. ०८०२९६/ श्री. संभानी विठ्ठल कोळेकर यांचा मोलाचा सहभाग आहे.
अंगावर लोखंडी गेट पडून आठ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रोशन रमेश दुबे असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. बुलढाणा येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत ही घटना घडली आहे. विद्यार्थी मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील निमखेडी गावाचा रहिवासी आहे. घटनेनंतर आश्रम शाळेतील विध्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी शाळेतच आंदोलन सुरू केलं आहे. शाळा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त असलेला तालुका म्हणून ओळखला जाणारा भामरागड तालुका दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटा वरील पुल आणि इतर नाले भरून वाहतात परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो. अशावेळी गरोदर मातांच्या प्रसुती दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी नेता येत नाही. त्यामुळे अनेक मातांना आपला जीव गमवावा लागतो. तर अनेक माता आपला जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रूग्णालयापर्यंत पोहचत असल्याची अनेक उदाहरण आपण एबीपी माझ्याच्या माध्यमातून प्रेकषकांनी बघितले होते. यामूळे पहिलांदाच स्त्रीरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता विशेष आरोग्य पथक भामरागडला रवाना झाले आहे.
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) आपल्या अहवालात केला आहे. गुजरात सरकारने तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा होती, त्यासाठी हा कट आखला असल्याचे गुजरात सरकारच्या SIT ने म्हटले आहे. एसआयटीच्या या दाव्यानंतर जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले. सकाळी एका विशेष विमानाने ते कानपूर विमानतळावर पोहोचले, तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते जालौनला रवाना झाले. बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा PM मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याची पायाभरणी त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. या एक्स्प्रेस वेची जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि राष्ट्रीय निवडणूक वॉचने विधान परिषदेच्या अनुषंगाने विश्लेषण केले आहे. त्यानुसार कोणत्या आमदारांवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. ADR च्या अहवालानुसार, 78 पैकी 62 विद्यमान महाराष्ट्र विधान परिषदेच्या (MLC) गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर पार्श्वभूमी तपशीलांचे विश्लेषण केले आहे. सध्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेत 16 जागा रिक्त आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. दोन दिवसांपूर्वी 14 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला.
गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत असे वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू असताना आता मेटे यांनी केलेल्या वक्तव्याने नवे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
पुणे : पानशेत रस्त्यावर ओसाडे आणि सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर एका खाजगी जागा मालकाने बांधलेली संरक्षक भिंत आणि दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. शनिवारची सुट्टी असल्याने पानशेतकडे निघालेले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. या घटनेमुळे अवैध उत्खनन व बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा
साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवी (Saptshrungi Devi) मूर्तीच्या संवर्धनावरून नवा वाद निर्माण झाला असून पंढरपूर (Pandharpur) आणि कोल्हापूरला (Kolhapur) जे झालं, ते सप्तशृंगी देवीबाबत होऊ देणार नाही असा इशारा अखिल भारतीय किन्नर आखाड्याचे श्री महंत ऋषिकेश नंदगिरी यांनी दिला आहे. शिवाय देवस्थान ट्रस्टने (Saptshurngi Devi Trust) मनमानी केल्यास गडाच्या पहिल्या पायरीवर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
बीड : केज तालुक्यांतील शेलगाव गांजी येथील गावा लगतच्या वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुला जवळच्या नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखे दिसत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच पडलेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तसेच मांसाहारी लोकांची देखील मासे पकडण्यासाठी गर्दी होत असून अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्यांचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदिला माशांचा पूर आल्या सारखे अत्यंत मनमोहक आणि मनाला मोहून जाणारे दृश्य आहे.
नागपूरः ब्रॉंडिंग नसलेले अन्न धान्याचा उपयोग मध्यमवर्गीय आणि गोरगरींबांकडून होत असतो. मात्र केंद्र सरकारच्या नव्या अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयामुळे या गोष्टी महागणार आहेत. आधीच जनता महागाईने त्रस्त असताना या निर्णयामुळे गोरगरीबांचे जगणेही कठीण होणार आहे. या सरकारच्या धोरणाविरोधात देशभरात व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा सांकेतिक संप पुकारला असून नागपूरातील 3 हजारावर व्यापारी यात सहभागी झाले असून त्यांनी दिवसभर दुकान बंद ठेवत निषेध नोंदविला. या संपात दालमिल, राईसमिल, अन्नधान्य विक्रेते आणि आईल व्यापाऱ्यांसह आदींचा सहभाग आहे.
आज जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आषाढी वारी पालखीचा परतीचा सोहळा पंढरपूर हुन देहू या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना पुणेजिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील शुक्रवारचा मुक्काम उरकून निमगाव केतकीमध्ये शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. या वेळी निमगाव केतकी मधील ग्रामस्थांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर लावलेल्या पाच टक्के GST विरोधात आज व्यापाऱ्यांनी राज्य व्यापी बंद पुकारला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार व्यापाऱ्यांनी ही कडकडीत बंद पुकारला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर पाच टक्के जीएसटी लावल्याने व्यापारी,शेतकरी,आणि ग्राहक यांना त्याचा फटका बसणार असून महागाई वाढणार असल्याने हा जीएसटी सरकारने रद्द करावा अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे.
पुण्यातील व्यापाऱ्यांची GST विरोधात बैठक सुरू झाली आहे. शहरातील अनेक व्यापारी पूना मर्चंट चेंबरमध्ये पोहचले आहेत. जीएसटी नको असा नारा देत त्यांनी आज बंद पाळला आहे.
हिंगोलीत शिंदे गटातील शिवसैनिकांची बैठक सुरू झाली आहे. अनेक शिवसैनिक बैठकीला हजेरी लावली आहे. मुंबईहून परतल्यानंतर शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे.
संजय राऊत यांची नागपुरात बैठक सुरु असतानाच शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलंय. संजय राऊत यांची भेट होत नसल्याने काही शिवसैनिक संतप्त झाले. शुक्रवारच्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूरात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर शिवसैनीकांची नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील आमदार भरत गोगावले, कर्जत येथील महेंद्र थोरवे, अलिबाग येथील महेंद्र दळवी यांनी शिंदे गटात समावेश केला आहे. महाड येथील आठ नगरसेवक, तालुका अध्यक्ष सुरेश महाडिक यांच्या समवेत महाड येथील सर्व पदाधिकारी हे शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्यासोबत आहेत. फक्त एकच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या गटात आहे.
शिवसेना सोडून गेलेल्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचीच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नका असेही राऊत यांनी म्हटले.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन-तीन दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे पाकिस्तानने इंधन दरात कपात केली आहे. तर, दुसरीकडे भारतात इंधन दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today 16th July 2022) जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही.
Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करण्यात येत आहे. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली गेली. यावेळी शहरातील टी.व्ही.सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्याप्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
देशात सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसामुळे वाढणारे संसर्गजन्य आजारांचा धोका दुसरीकडे देशात झालेला मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव आणि त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
केंद्र सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावल्याने आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद आहे. या निर्णयाला विरोध म्हणून खामगाव येथील अडते - व्यापारी संघटना यांनी आज बाजार समितीतील कामकाज कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज ठप्प झालं आहे.
उद्यापासून २ दिवस
मुंबईत काँग्रेसच्या
बैठकांचा सिलसिला
-------------------
राष्ट्रपती निवडणूक,
वि.परिषद क्रॉस व्होटिंगच्या
अनुषंगाने बैठक
---------------
बैठकांना काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते उपस्थित
राहणार
कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव हा सण असून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपा कडून मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून 'मोदी एक्स्प्रेस' कोकणात धावणार आहे. गेल्या वर्षी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतून कोकणसाठी 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात आली होती. यावर्षी मुंबई भाजप च्या पुढाकाराने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुटणार आहे. भाविकांना घेऊन ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजप मुंबईकडून उचलला जाणार आहे.
कोकणातून देखील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात!
दापोली आणि मंडणगडमधील नगरसेवकांची घेतली शिंदे यांची भेट
मुंबईत योगेश कदम यांच्या नेतृत्नात 11 नगरसेवकांनी घेतली भेट
मंडणगडमधील 8 तर दापोलीतील 3 नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
मंडणगडमधील विनोद जाधव, मुश्ताक दाभिळकर, योगेश जाधव, प्रमिला किंजळे, स्नेहल गुवळे, सापटे, प्रविण जाधव यांनी घेतली शिंदे यांची भेट
तर, दापोलीमधील नगरसेवक शिवानी खानविलकर आणि प्रति शिर्के यांनी घेतली शिंदे यांची भेट
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांचा जनता दरबार भरला आहे. आज सकाळपासून बारामतीतील विकास कामांची पाहणी केली आणि त्यांचा सध्या जनता दरबार सुरू आहे. बारामती मतदार संघातील लोकांना पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागू नये यासाठी अजित पवार दर आठवड्याला जनता दरबार घेत असतात. नागरिकांच्या समस्या समजून घेत असतात आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न अजित पवार करतात. आज बारामतीतील विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आंबोली या राज्य मार्गावर रात्री टस्कर हत्तीने ठाण मांडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गवसे परिसरात टस्करने धुमाकूळ घातला आहे. गवसे येथील जंगलात ठाण मांडलेल्या हत्तीने पिकांचे नुकसान सुरू केल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या अगोदर सुद्धा बराच वेळ हत्तीने या रस्त्यावर ठाण मांडले होते. वन विभागाने हत्तीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
पार्श्वभूमी
पंतप्रधान मोदी करणार बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
शिंदे सरकारची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक
शिंदे सरकारची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक आहे. या बैठकीत ठाकरे सरकराने घेतलेल्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला जाणार आहे.
अन्नधान्य, डाळींवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांचा बंद
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी उद्या देशव्यापी बंदची हाक दिलीय. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केलाय. त्यासाठी उद्या एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य
पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे.
मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी
देशात केरळात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केरळातील पाच जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. युएईतून आलेल्या एका 35 वर्षीय इसमाला संसर्ग झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -