एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 35 ते 40 जण जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates :  सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 35 ते 40 जण जखमी

Background

'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' हसन मुश्रीफांचं वक्तव्य अन् एकच हशा, सांगितली सरकार स्थापनेची आठवण

sangli news updates:   'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवलीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी. महाविकास आघाडीच्या सरकार  स्थापनेची आठवण सांगताना  ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. इस्लामपूर पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण आणि शिक्षण विभागाच्या ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ajit Pawar : राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं : अजित पवार

Deputy cm Ajit Pawar  : आजपर्यंत देशात, राज्यात कधीही अशी परिस्थिती नव्हती. यापूर्वी कधीही नोटीसा देणं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं असं होत नव्हतं. यावर सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाने आपापलं काम करावं, जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांचं काम करावं असेही अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं असेही ते म्हणाले.

आज भाजपच्या होणाऱ्या आंदोलनाबाबत देखील अजित पवार यांना विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले की, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काल यशवंतराव चव्हण यांची जयंती होती. त्यानिमित्त आम्ही सर्वांनीच त्यांचे स्मरण केले. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी स्विकारली. यावेळी त्यांनी जबाबादारी असणाऱ्या व्यक्तिंनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहजे, जबाबादारी कशी पूर्ण केली पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन कसं गेलं पाहिजे  हे दाखवून दिल्याचे अजित पवार म्हणाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप एकण्यात सामान्य लोकांना अजिबात रस नाही. आमचे प्रश्न सुटावेत याकडे लोकांचे लक्ष असल्याचे अजित पवार म्हणाले. आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व दिलं पाहिजे आणि त्यातून राज्याचा विकास कसा  होईल याकडं लक्ष द्यायला हवं असे अजित पवार म्हणाले.

23:43 PM (IST)  •  13 Mar 2022

परभणी - एकाच दुचाकीवर पाच जण , तिघांनी गमावला जीव

एकाच दुचाकीवर 5 जण जाणे युवकांना चांगलेच महागात पडले आहे. एसटी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असुन इतर 2 जण गंभीर झाले आहे.परभणीच्या चारठाना परिसरातील सिंगटाळा पाटीवर ही घटना घडलीय..
 
23:29 PM (IST)  •  13 Mar 2022

 Solapur News Update : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 35 ते 40 जण जखमी

 Solapur News Update : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 35 ते 40 जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात झाला आहे. 
 
22:24 PM (IST)  •  13 Mar 2022

अमरावती - शेतशिवारातील शेततळ्यात दोघांचा बुडून मृत्यू..

अमरावती जिल्ह्यातील कुष्टा बु.शेतशिवारातील शेततळ्यात दोघांचा बुडून मृत्यू..

अचलपूर तालुक्यातील कुष्टा बुद्रुक येथे आज सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास गावालगतच असणाऱ्या शैलेश हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्या नजिक गावातीलच 11 वर्षीय हर्षाली विनोद वांगे मुलींचा अचानक तोल गेल्याने ती शेततळ्यात बुडाली,..

हीच बाब लक्षात येता शेतातील रखवालदार यांचा मुलगा बाजीलाल मुन्ना कास्‍देकर (वय 25) तिला वाचविण्यासाठी गेला असता त्याचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला..

21:25 PM (IST)  •  13 Mar 2022

मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं - मुख्यमंत्री

मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याच्या (MCAP) अहवालाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या अहवालाचे लोकार्पण पार पडले असून यावेळी मुंबई आणि येथील पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असा आहे, असं म्हणतााना असं केल्यास जगातला पहिला देश आपण ठरु शकतो असंही ते म्हणाले. आपण शाश्वत विकास असेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि तसं ठरवायला पाहिजे मी या सर्वाची वाट पाहातोय, असंही ते म्हणाले. आपण समुद्राचं पाणी पिण्यालायक करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले

20:45 PM (IST)  •  13 Mar 2022

टाळी एका हाताने वाजत नाही - अजित पवार

Ajit pawar in pune latest news : एकमेकांचा राग केला नाही पाहिजे. एकमेकांना संपविण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जातोय.  हे चुकीचे आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचाही विचार केला जात नाहिए. माझं असं मत आहे की दोन्ही बाजूंकडून चुकतय. टाळी एका हाताने वाजत नाही, असे अजित पवार म्हणाले. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special ReportSpecial Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोलZero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget