एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 13 June 2022 : राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार, विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा सावध पवित्रा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 13 June 2022 :  राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार, विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा सावध पवित्रा

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

राहुल गांधी आज ईडी समोर हजर राहणार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधी आज हजर रहाण्याची शक्यता आहे.   राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल

 सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात कॉग्रेस आज ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.  या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर महत्वाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.  

 निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना 
 
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना होणार आहे. सकाळी 10 वाजता निवृत्ती नाथांच्या समाधी मंदिरापासून पालखीने मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्रंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात होणार आहे. 

1969 : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.

1967 : विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. 

विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना 1962 साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.

16:58 PM (IST)  •  13 Jun 2022

या पुढे कार्यकर्त्यांना त्रास दिला तर सहन करणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा 

धनंजय  महाडिक यांनी केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात आणलं पाहिजे. कोल्हापूर शहर जिल्हा हे फक्त त्यांच कार्यक्षेत्र नाही तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांना काम करावं लागणार आहे. आवाडे आणि कोरे यांच्यावर प्रचंड दबाव होता तरीही ते आमच्या सोबत राहिले . महाडिक म्हणून असलेली ताकद, कोरे, आवाडे आणि भाजप असे एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवू आणि जिंकू. या पूर्वी आम्ही घाबरलो नव्हतो. परंतु, या पुढे कार्यकर्त्यांना त्रास दिला तर सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. 

16:56 PM (IST)  •  13 Jun 2022

VidhanParishad Election : राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार, विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा सावध पवित्रा

VidhanParishad Election :  राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार  आहे.  अयोध्या दौ-यावर सेनेचे आमदार जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फक्त अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौ-यावर आणि 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे. 

16:29 PM (IST)  •  13 Jun 2022

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे.  तपासयंत्रणेनं दाखल केलेलं आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा अयोग्य आहे. मुंबई सत्र न्यायालयात उद्या, मंगळवारी सुनावणी  होणार आहे. 

16:18 PM (IST)  •  13 Jun 2022

Buldhana : जिल्ह्यातील 13 पैकी 11 परिषदांच्या प्रभाग नुसार सदस्यपदाचे आरक्षण जाहीर

बुलढाणाः राज्यभरातील 216 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13 पैकी 11 परिषदांच्या प्रभाग नुसार सदस्यपदाचे आरक्षण काढण्यात आले. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषदांच्या प्रभाग द्वी सदस्यीय पद्धतीनुसार निवडणूक होणार आहे. यासाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायती आहेत. यापैकी नगर पंचायतीच्या निवडणुका आताच झाल्याने येत्या काळात फक्त 11 नगर पालिकांच्या निवडणूक होणार आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात आली.

15:57 PM (IST)  •  13 Jun 2022

ईडीची नोटीस आली तर, जाऊन उत्तर दिले पाहिजे : खासदार नवनीत राणा

आपल्या देशात कायदा आणि संविधान सर्वांसाठी एकसमान आहे. राहुल गांधींना ईडीची नोटीस आली तर त्यांनी जाऊन उत्तर दिले पाहिजे. कुठलीही यंत्रणा सबळ पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही, असे मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. आपल्याला जर नोटीस आली तर आपणही सामान्य माणसाप्रमाणे तिथं जाऊन उत्तर देऊ, त्यात कुणालाही हरकत नसावी आणि त्यासाठी आंदोलन करणेही योग्य नाही. असा टोलाही खासदार राणा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget