Maharashtra Breaking News 08 July 2022 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत या भेटीत चर्चा होईल अशी शक्यता आहे. आज दुपारी 4.30 वाजता ते मुंबई विमानतळाकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजताच्या विमानानं ते दिल्लीला जातील.
विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी
विधान भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजपाचे प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे आज शपथ घेतील.
आदित्य ठाकरेंची बंडखोरांच्या मतदारसंघात ‘निष्ठा यात्रा’
एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. मुंबईतल्या शाखा शाखांमध्येही आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत निष्ठा यात्रा काढणार आहेत.
संजय राऊतांची पक्षबांधणीला सुरुवात
शिंदे गटाच्या टार्गेटवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीची सुरुवात राऊतांनी नाशिकपासून केली आहे. आज संजय राऊत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते यावेळी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. नाशिकमधून माजी कृषीमंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे शिंदे गटात गेले आहेत.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
वारी अपडेट
संत तुकारामांची पालखी पिराची कुरोली येथून निघेल आणि वाखरी येथे मुक्कामी असेल. बाजीराव विहिर येथे उभं रिंगण होईल. सत ज्ञानेश्वरांची पालखी भंडीशेगाव येथून निघेल आणि वाखरीला मुक्कामी असेल. बाजीरावची विहिर येथे उभं आणि गोल रिंगण होईल.
ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी आशा : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, "काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी. सरकार कडून न्याय मिळेल असा विश्वास आहे".
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर पोहचतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर पोहचतील असं सांगण्यात आलय. पुणे एअरपोर्टवरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील. दरम्यान एअरपोर्टवरून निघाल्यानंतर हडपसर गाडीतळ भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगीरे यांनी शिंदेंच्या सत्काराचे आयोजन केलंय. यावेळी शिवसेनेतील काही इतर नेते आणि पदाधीकारी देखील शिंदेंबद्दल निष्ठा दाखवण्यासाठी हडपसमधे उपस्थित राहणार आहेत. हडपसरमधे आयोजित करण्यात आलेल्या शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमास कोण कोण उपस्थित राहतं याकडे शिवसेना नेतृत्वाच लक्ष असणार आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे आधीच शिंदे गटात दाखल झालेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला परवानगीचे पत्र जिल्हा प्रशासनाने दिले , परवानगी नंतरच एकनाथ शिंदे करू शकणार महापूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका
जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची काम थांबवली आहेत. नव्याने काढलेल्या सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने 4037 कामांच्या निविदा काढल्या होत्या. या सर्व निवीदा आता रद्द होणार आहेत.
माजी खासदार आनंदराव अडसूळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
माजी खासदार आनंदराव अडसूळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला , दिल्ली येथे घेतली भेट