एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 03 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 03 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आरे बचावासाठी आज पर्यावरणवाद्यांचं सकाळी 11 वाजता आंदोलन
ज्यात सत्तांतर होताच मुंबईतल्या मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. नव्या सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सकाळी 11 वाजता आरे परिसरात पर्यावरणवादी एकत्र येणार आहेत. कारशेड पुन्हा आरेमध्ये आणल्यास आम्ही पुन्हा येऊचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आलेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

विधानसभा अध्यक्षांची निवड आज होणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज बोलावलेल्या विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष सत्रामध्ये अध्यक्षांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची या आधीच घोषणा झाली आहे.  विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 
- मंत्र्यांचा परिचय.
- नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय.
- अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपालांचा संदेश.
- अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा.
- भाजपचे चंद्रकांत पाटील हे राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. गिरीश महाजन अनुमोदन देतील.
- चेतन तुपे हे राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. संग्राम थोपटे अनुमोदन देतील.
- अध्यक्षांची निवड

शिवसेना आमदारांना व्हीप जारी
आज शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहेत. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी सुनील प्रभूंनी शिवसेना आमदारांना व्हीप जारी केलाय. हा व्हिप उद्धव गटासह शिंदे गटातील आमदारांनाही लागू आहे. मात्र, हा व्हिप आम्हाला लागू होत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताकारणामध्ये घेतलेल्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरातील गांधी पुतळा या ठिकाणी सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार आहे.  

उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी केल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कॅप्टन यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या विलीनीकरणामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे बोलले जात आहे. 
 
पुढील 48 तास कोकण आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
आज कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात 4 आणि 5 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

भाजप राष्ट्रीय कार्यकारणीचा दुसरा दिवस
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमधील जनसभेला संबोधित करणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मोदी कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता मोदींची सभा होणार आहे. 
 
वारी अपडेट
ज्ञानेश्वरांची पालखी फलटणहून निघेल आणि बरडला मुक्कामी थांबणार आहे. तुकोबांची पालखी इंदापूरला मुक्कामी राहील. 

19:18 PM (IST)  •  03 Jul 2022

नांदेड येथील आमदार जाण्यामागे कुठली अदृश्य शक्ती आहे हे माहीत नाही,पण यामागे मी नाही-हेमंत पाटील शिवसेना खासदार.

नांदेड येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात सामील होण्यामागे कुठली अदृश्य शक्ती होती हे माहीत नाही,पण यामागे मी मात्र नाही हे नक्की आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.तसेच माझ्या प्रमाणे अनेक आमदार खासदारांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे संबंध असणे काही गैर नाही.त्यामुळे शिवसैनिकांनी कुठल्याही प्रकारचा संशय  मनात आणू नये असे मत हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात व्यक्त केलंय.तर शिवसेनेतील 18 पैकी 14 खासदार भाजप च्या संपर्कात असून फुटल्याचा भाजपचा दावा पाटील यांनी फेटाळलाय.

19:16 PM (IST)  •  03 Jul 2022

अमरावतीची घटना घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप ! खासदार अनिल बोन्डे यांचा आरोप

अमरावती येथे उमेश कोल्हे आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानांमधून निघतो आणि त्याचा गळा कापून खून केला जातो ही घटना म्हणजे महाविकास आघाडीचे पाप पाप आहे असा आरोप नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी  काही वेळापूर्वी खामगाव येथे केला आहे. येथील एका खाजगी कार्यक्रमात ते आले असता पत्रकारांची बोलत होते.

19:14 PM (IST)  •  03 Jul 2022

खासदार नवनीत राणा मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या घरी दाखल..

खासदार नवनीत राणा मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या घरी दाखल..

उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी नूपुर शर्मा यांची काही पोस्ट व्हायरल केल्याने त्यांची हत्या करण्यात आली..

खासदार नवनीत राणा ह्या मुंबई वरुण अमरावतीत आल्याबारोबर त्या थेट कोल्हे कुटुंबांना सांत्वन भेट देण्यासाठी पोहचल्या...

17:05 PM (IST)  •  03 Jul 2022

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने शिक्षेसाठी समन्स बजावले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने शिक्षेसाठी समन्स बजावले आहे. 5 जुलै रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. 

16:00 PM (IST)  •  03 Jul 2022

Amravati : इरफान खानला अमरावती न्यायालयाने चार दिवसांची दिली पोलीस कोठडी

उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान खानला अमरावती न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याआधी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget