Maharashtra Breaking News LIVE Updates : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Petrol Diesel Price Today 1st April : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरांनी सर्वसामान्यांनी धाकधूक वाढवली आहे. अशातच आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आज देशातील इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत सातत्यानं झालेल्या दरवाढीनंतर अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे.
शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.
दरवाढीचा झटका, हळूहळू देतायत तेल कंपन्या
देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागलं. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले.
एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) संप अजूनही मिटलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंतकामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिलेली ही मुदत काल संपली. अजूनही एसटीचे हजारो कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांना कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाण्याची शक्यता आहे.
Ahmadnagar Fire : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग
Ahmadnagar Fire : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत पहिला मजला जळाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
Akola News Update : महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला जामीन मंजूर
Akola News Update : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर बिलासपूर उच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 26 डिसेंबर 2021 ला महात्मा गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज्यातही वर्धा, पुणे, ठाणे, अकोला आणि कल्याण येथे कालिचरणवर महारावर गुन्हे दाखल झाले होते. सोमवारी ते तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
Mumbai Local : लोकलखाली म्हशी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Local : लोकलखाली म्हशी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण ते कसारा मार्गावरील टिटवाळा स्टेशनजवळ अपघात घडला. एकूण तीन म्हशी आल्या. लोकांसमोर त्यापैकी केवळ एकच म्हैस जिवंत आहे
यामुळे तब्बल एक तास कसारा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होती. राजधानी एक्सप्रेस देखील अडकली तसेच नंदीग्राम आणि मुंबई आग्रा एक्सप्रेस देखील यामुळे थांबून होती. तसेच दोन टिटवाळा लोकल आणि एक आसनगाव लोकल देखील रखडली. एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्यामुळे टिटवाळा, आसनगाव, कसारा येथून सुटणाऱ्या लोकल प्रचंड उशिराने धावत आहेत.
Parbhani News Update : पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा केक कापला, परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
Parbhani News Update : इंधनाचे वाढते दर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हे सर्व जुमले असल्याचा आरोप करत परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा केले कापून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय यावेळी वाढत्या महागाईचा निषेध या आंदोलक कर्त्यांनी केला.
Kirit Somaiya : किरीट सोमय्या पुण्यातील आयकर सदनमध्ये
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील आयकर सदन या ठिकाणी पोहोचल्या आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचलेत. हसन मुश्रीफ यांनी लुटीचा माल सरकारी तिजोरीत जमा करावा. राऊत यांनी पहिला हप्ता म्हणून 55 लाख रुपये ED कडे भरले आहेत, त्यांच्याकडून मुश्रीफ यांनी काहीतरी शिकावं असं किरीट सोमय्या म्हणाले.