Pankaja Munde LIVE : गोपीनाथ गडावरुन प्रत्येक घडामोडींचे LIVE Updates
Gopinath Munde Birth Anniversary : गोपीनाथ गडावरुन LIVE Updates, समर्थकांची गर्दी, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स पाहा
LIVE
Background
Gopinath Munde Birth Anniversary : भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनासाठी हजर झाले आहेत.
मध्यप्रदेश सरकारकडून महाराष्ट्र सरकरने काहीतरी शिकावे : पंकजा मुंडे
ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे कोतुक केले. परंतु, याचवेळी राज्य सरकारवर देखील त्यांनी टीका केली. मध्य प्रदेश सरकारकडून महाराष्ट्र सरकारने काही तरी शिकावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
Pankaja Munde : पराभव खूप काही शिकवून गेला : पंकजा मुंडे
'सध्या सुरू असलेलं राजकारण पाहून मन व्यथित होतं. मला काही मिळेल अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. परंतु, माझा जो पराभव झाला, त्यातून मी खूप काही शिकले अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Pankaja Munde गोपीनाथ मुंडे नाहीत याची खंत : पंकजा मुंडे
मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, गोपीनाथ मुंडे नाहीत याची खंत आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Pankaja Munde : ओबीसी आरक्षणावरून शिवराज सिंह सरकारकडून पंकजांकडून कौतुक
ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे कौतुक केले. मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली, पण मुंडे साहेब नसल्याची खंत वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
गोपीनाथ गडावर शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.