Maharashtra Breaking News LIVE : पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी
Breaking News LIVE Updates, 13 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Breaking News LIVE Updates, 13 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Collage Reopen : महाविद्यालयं सुरु होणार? आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
Maharashtra Collage Reopen : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, कालपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे. राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता व्हीसीद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सोबत बैठक घेणार आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल? कशा प्रकारच्या गाईडलाईन्स तयार कराव्या लागतील? याशिवाय वस्तीगृह सुरु करणं आणि इतर बाबींवर सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा करतील आणि त्यानंतर महाविद्यालय दिवाळीनंतर नेमकी कधी सुरु करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.
DC vs KKR Qualifier 2: दिल्लीचे दंबंग की, कोलकाताचे फायटर्स; कोण मारणार बाजी? काय सांगतात आकडे?
Delhi vs Kolkata, Qualifier 2 : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) एकमेकांविरोधात मैदानावर उतरणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खराब कामगिरीनंतर कोलकाताच्या संघानं दुसऱ्या टप्प्यात कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) च्या नेतृत्त्वात उत्तम खेळी करत वापसी केली. आयपीएल 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण कोलकातासमोर दिल्लीचं आव्हान आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या संघानं पॉइंट्स टेबल (Points Table) मध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. अशातच आज दिल्ली किताबावर नाव पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे.
Gati Shakti Yojana: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'गति शक्ति' योजनेची सुरुवात, काय आहे ही योजना?
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी संबोधित करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदी यांनी म्हटलं होतं.
पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी
पुण्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे
पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी
पुण्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे
पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी
पुण्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे
मावळमध्ये झालेला गोळीबार पोलिसांच्या आदेशावरून : देवेंद्र फडणवीस
जालियनवाला बागेत जनरलच्या आदेशावरून पोलिसांचा गोळीबार झाला आहे. मावळमध्ये झालेला गोळीबार पोलिसांच्या आदेशावरून झालेला आहे.
पंकजा मुंडेना सावरगावात भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी
पंकजा मुंडेना सावरगावात भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.