एक्स्प्लोर

Maharashtra New CM : महायुतीचं अखेर ठरलं! 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजताचा शपथविधीचा मुहूर्त पक्का, ठिकाणही निश्चित

Maharashtra New CM : महायुतीच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 

मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या नव्या इनिंगचा शपथविधी अखेर ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 

राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं तरी मुख्यमंत्रिपदाचं आणि शपथविधीचं काही ठरत नव्हतं. या आधी शपथविधीच्या तारखा आणि ठिकाणांवर अनेकदा चर्चा झाल्या. पण आता शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

राज्यात सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे आता निश्चित झालं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपमधून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव अंतिम झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात 2 डिसेंबर रोजी भाजपची बैठक असून त्यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपद आणि नगरविकासमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पण गृहमंत्रिपद हे शिंदेंना द्यायला भाजपने नकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, एकनाथ शिंदे शुक्रवारपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चार जणांचं पथक उपचार करत असल्याची माहिती  डॉक्टरांनी दिली. यादरम्यान जळगाव पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Pune : रुपाली विरुद्ध रुपाली वाद पेटला, अजितदादांची डोकेदुखी वाढणार Special Report
Farmer Protest : कर्जमाफीवरून बच्चू कडू-जरांगेत मतभेद? सरकारची केवळ चाल? Special Report
Mumbai Hostage Crisis : ऑडिशनच्या बहाण्याने अपहरण, थरारनाट्याचा एन्काउंटरने शेवट Special Report
Mumbai Hostage Crisis: रोहित आर्य एकटा नव्हता? ओलीसनाट्यात आणखी कोण सामील? Special Report
Zero Hour Vande Mataram Row : वंदे मातरमवरून Abu Azmi, Praveen Darekar आमनेसामने, वाद पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
Embed widget