Maghi Ganesh Jayanti 2023 Live Updates : गणपती बाप्पा मोरया! राज्यभर माघी गणेश जयंतीचा उत्साह; ठिकठिकाणी मंदिरात भाविकांची गर्दी
Ganesh Jayanti : आज गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती (Shri Ganesha Jayanti) म्हणून ओळखली जाते.
LIVE
Background
Ganesh Jayanti 2023 Live Updates : आज गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती (Shri Ganesha Jayanti) म्हणून ओळखली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असेही म्हटले जाते. गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला म्हणजे आज दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल.
संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते
असे म्हणतात की, विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते, तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या, दुःखापासून मुक्ती मिळते. बुध-केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी 2023 ला म्हणजेच आज आहे. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करायचे असेल तर शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया.
गणेश जयंती 2023 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल. मात्र, उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी बुधवारी आहे. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 आणि रवियोग बुधवारीच सकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल.
बारामती तालुक्यातील मोरगावात गणेश जयंतीच्या निमित्ताने जलस्नान आणि अभिषेक
Ganesh Jayanti 2023 : सांगलीमध्ये गणेश जयंती निमित्त गणपती मंदिरात आकर्षक सजावट
Ganesh Jayanti : गणेश जयंतीनिमित्त धुळ्यातील श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंतीनिमित्त धुळे शहरातील प्राचीन असलेल्या नवसाचा श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिराला गणेश जयंती आणि प्रजासत्ताक दिन यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेश विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील पांझरा नदीकाठी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
गणेश जयंतीनिमित्त धुळ्यातील प्राचीन नवसाचा श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांची गर्दी, विविध कार्यक्रमांचं आयोजन
Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंतीनिमित्त धुळे शहरातील प्राचीन असलेल्या नवसाचा श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिराला गणेश जयंती आणि प्रजासत्ताक दिन यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेश यागासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
Maghi Ganesh Jayanti 2023 : रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघीची यात्रा
Maghi Ganesh Jayanti 2023 : रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघीची यात्रा आहे. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं आहे. श्री च्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे मंदिरात आले आहेत. आज सायंकाळी माघी गणेशोत्सवानिमित्त श्री ची पालखी निघणार आहे. माघी उत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिरात पुढील तीन दिवस कार्यक्रम चालणार आहेत.