Lok Sabha Election Voting Live Update : देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे 62.27 टक्के मतदान, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती?
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज. महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार...
LIVE

Background
राज्यात अंदाजे 62 टक्के मतदान, जाणून कोणत्या मतदारसंघात किती?
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 62 टक्के मतदान पार झाले. कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले? जाणून घेऊयात...
लातूर- 60.18
सांगली- 60.95
बारामती- 56.07
हातकणंगले - 68
कोल्हापूर- 70.35
माढा- 61.17
उस्मानाबाद- 60.91
रायगड- 58.17
रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 59.23
सातारा- 63.05
सोलापूर- 57.61
Ratnagiri : चिपळूणमध्ये मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ, 400 मतदान ताटकळत
चिपळूणमधील खेड परिसरात मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ उडाला आहे. अंधारात मतदान करावे लागत असल्याने अद्यापही चारशेहून अधिक मतदार केंद्राच्या बाहेर मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदार आक्रमक झाल्यानंतर प्रशांसन कामाला लागलं असून विजेची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्थेची धावपळ सुरू आहे.
रांगेतील मतदान संपण्यास रात्रीचे 9 वाजतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदार आक्रमक झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रात अंधार असल्याने प्रक्रियेला अर्धा तासाहून अधिकचा वेळ जात असल्याने रांगेतील मतदार ताटकळले आहेत. आक्रमक मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे मतदान केंद्रात पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनावश्यक गर्दी हटवत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
Sindhudurg : नॉट रीचेबल असलेले किरण सामंत यांनी अखेर मतदान केलं, पालीमध्ये बजावला मतदानाचा हक्क
सकाळपासून नॉट रीचेबल असलेले किरण सामंत यांनी अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू असून त्यांनी पाली या त्यांच्या मूळगावी मतदानाचा हक्क बजावला.
EVM Fire : मतदाराने ईव्हीएम पेटवलं, माढा मतदारसंघातील सांगोल्यामधील प्रकार
सोलापूर : मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न सांगोल्यात करण्यात आला आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
Latur : सूनेगाव सांगवी गावच्या मतदान केंद्रावर मतदान झालेच नाही...गावाची "ही" होती मागणी
Latur : लातूर लोकसभा मतदारसंघ ची निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे मात्र सुनेगाव सांगवी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.बहिष्कार टाकण्याचे मुख्य कारण एकच आहे.हे गाव लातूर नांदेड हायवे वर आहे. मात्र ह्या गावाला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हायवेला कट रस्ता नाही. यामुळे गावकऱ्यांना वळसा घालून जावे लागते.यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती, शाळेत जाताना सर्वांना खूप त्रास होत आहे.यामुळे या मागणीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. 477 मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.मतदान केंद्र कडे कोणी ही फिरकले ही नाही ..लोकसभा च नव्हे तर मागणी मान्य झाली नाही तर कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

