एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates : पुण्यातील दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटली; 12 जण जखमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

LIVE

Key Events
Maharashtra Live Updates : पुण्यातील दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटली; 12 जण जखमी

Background

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

मुंबई सत्र न्यायालयात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी तसेच जेईई परीक्षेनंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी परसेंटाईल सक्तीचं केल्याच्या मुद्दावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

संभाजीनगरमध्ये आज भारत राष्ट्र समिती पक्षाची जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर मध्ये आज BRS पक्षाची जाहीर सभा होणार आहे. यावेळी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे सभेची जबाबदारी आहे. सभेला पोलिसांनी काही अटींसह परवानगी  दिली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. 

रत्नागिरी रिफायनरीसाठी आजपासून सर्वेक्षण 

रखडलेल्या रत्नागिरी रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. सध्या विरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड होत आहे. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. त्यामुळे सध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता होणारा विरोध हा मोठा असेल. मुख्य बाब म्हणजे रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे. आजची तारीख मागच्या वेळी कोर्टाने दिली होती. पण कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही. सत्तासंघर्षाच्या निकालानंतरच चिन्हाबाबत कोर्टाची पुढची भूमिका ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण शिंदेंना देण्याचा जो निकाल दिला त्या विरोधात ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला वापरता येणार आहे.

औरंगाबाद जिल्हा नामांतराविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात  सुनावणी

औरंगाबादच्या नामांतरामागे  कुठलेही राजकीय कारण नाही, अस राज्य सरकारतर्फे मागील सुनावणी वेळी कोर्टासमोर सांगण्यात आलं होतं. औरंगाबाद जिल्ह्याच नाव बदलण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर केंद्र सरकारने काढलेल्या अधिसुचनेला आव्हान  देणार्‍या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मात्र राज्य सरकारने वेळ मागीतल्याने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने औरंगाबाद नामांतर विरोधातील याचिकेवर सुनावणी 24 एप्रिलला निश्‍चित केली आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 50 वा वाढदिवस

सचिनच्या चहात्यांकडून देशभर आनंदात वाढदिवस साजरा केला जाणार आहे. 

राहुल गांधी यांच्यासंबंधित पाटना न्यायालयात सुनावणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर पाटना उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून, त्यात पाटनाच्या आमदार-खासदार यांनी न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना 25 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. एका सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की, सगळे मोदी चोर आहेत. या टिप्पणीच्या आधारे भाजप नेते सुशील मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधींच्या मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तक्रार दाखल केली होती.

कोर्टातील सुनावण्या 

मुंबई सत्र न्यायालयात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी.  व्यावसायिक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यां दोघांच्या जामीन अर्जांवर आज  सुनावणी होणार आहे. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सदानंद कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर होणार सुनावणी.

जेईई परीक्षेनंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी परसेंटाईल सक्तीचं केल्याच्या मुद्दावर आज हायकोर्टात सुनावणी. मागील सुनावणीच्यावेळी केंद्रीय परिक्षा संस्थेला (एनटीए) आपलं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, त्या अनुशंगाने मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी...  प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर एनटीए आज आपली भूमिका स्पष्ट करणार... आयआयटीकरता प्रवेश परिक्षा असतानाही बारावीत 75 टक्के गुण बंधनकारक कशासाठी ? याचिकेत अस  सवाल करण्यात आला आहे.

 

22:39 PM (IST)  •  24 Apr 2023

Pune News: दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटली; 12 जण जखमी

Pune News: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहेत. या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 50 ते 60 जण प्रवस करीत होते. ही बस मुंबईहून तेलंगणाला निघाली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. सध्या यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

20:29 PM (IST)  •  24 Apr 2023

Beed News: बीडच्या पिंपरनई येथे तलावात बुडून दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Beed News:  बीड तालुक्यातल्या पिंपरणई येथे तलावात बुडून एका दहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवराय वायभट अस या मुलाचे नाव असून बेलेश्वर मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या सप्ताहासाठी तो आपल्या कुटुंबीयांसोबत आला होता..आणि यावेळी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या तलावात तो पोहण्यासाठी गेला असता तलावात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
 
20:28 PM (IST)  •  24 Apr 2023

Beed News: बीडच्या पिंपरनई येथे तलावात बुडून दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Beed News:  बीड तालुक्यातल्या पिंपरणई येथे तलावात बुडून एका दहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवराय वायभट अस या मुलाचे नाव असून बेलेश्वर मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या सप्ताहासाठी तो आपल्या कुटुंबीयांसोबत आला होता..आणि यावेळी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या तलावात तो पोहण्यासाठी गेला असता तलावात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
 
20:28 PM (IST)  •  24 Apr 2023

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात दुर्दैवी घटना... वीज पडून एकच कुटुंबातील चार जण ठार

Gadchiroli News:  भरत राजगडे आणि त्यांची पत्नी व मुली असे चार जण पाऊस आल्यामुळे झाडाखाली असताना वीज पडून जागीच ठार झाले. देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहवाशी असलेले भरत राजगडे यांनी कुरखेडा तालुक्यात एक लग्न समारंभात दुचाकीने गेले होते लग्न समारंभ आठपुन परत येत असताना देसाईगंज वडसा कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील दूध डेयरी तुळशी फाटा जवळ वादळ व पाऊस सुरू झाल्यामुळे एक  झाडाखाली थांबले सायंकाळच्या सुमारास वीज पडून  एकच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

20:02 PM (IST)  •  24 Apr 2023

पारनेर तालुक्यात तहसील कार्यालयासमोर आंदोलन...

पारनेर तालुक्यातील अनेक शिव पाणंद शेतरस्त्यांसह, पाझर तलावांच्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे... याबाबत महसूल प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील समाधान होत नसल्याने आधार फाउंडेशनच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले... गांधीगिरी करत पेरू वाटून शासनाचा निषेध नोंदवला गेला. यावेळी तहसीलदार शिवकुमार आवळकंडे चांगलेच संतापले. तहसील कार्यालयाच्या दरवाजात तमाशा करू नका अन्यथा कलम 144 नुसार आतमध्ये टाकेन अस सज्जड दमच तहसीलदारांनी दिला.  तसेच आंदोलकांच्या पेरूच्या पेट्या गेटच्या बाहेर फेकून देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले.  दरम्यान असा पध्दतीने आंदोलन केले जाणार असल्याचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं होतं.  जर त्यांचा आंदोलनावर आक्षेप होता तर त्यांनी त्याचवेळी कर्मचाऱ्यांना सूचना द्यायला हवी होती. मात्र आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांचा माल फेकून देत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे म्हणत आंदोलकांनी तहसीलदारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आधार फांऊडेशन संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
×
Embed widget