Maharashtra News Updates: मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी; गावखेड्यात शेतकऱ्यांचं नुकसान, देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आज वरुणराजा बरसेल. या सर्व घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घटनांची संपूर्ण माहिती मिळवा एका क्लिकवर...
Sindhudurg Rain : तळाशील खाडीत बोट बुडून दोघे बेपत्ता, एकजण सुखरुप
Sindhudurg Rain : मालवण तालुक्यातील तळाशील खाडीत बोट बुडून दोघे बेपत्ता झाले, तर एक जण पोहत बाहेर पडला. ही घटना रात्रीची असून प्रशासनाने सकाळपासून दोन बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेली बोट बाहेर काढण्यात यश आलं आहे. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने बोट तळाशील खाडीत बुडून ही दुर्घटना घडली.
Sangli Rain : मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी प्रवाहित
Sangli Rain : सांगलीत कृष्णा नदी पात्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी प्रवाहित झाली आहे. कृष्णा नदीवरील सांगलीवाडी जवळच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
Vasai Rains : वसई-विरारमध्ये रस्त्यांची हालत; वाहतूककोंडीमुळे फटका
Vasai Rains : मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस पडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी निचऱ्यासाठी टाकण्यात आलेल्या गटाराच्या खड्ड्यात माती टाकल्यामुळे पाणी जायला जागा नाही. यासोबतच पावसाच्या पाण्याने रस्ता खचल्याने अवजड वाहनं खड्ड्यात फसत आहेत. महामार्गाच्या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
Mumbai : सहा वर्षीय मुलाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Mumbai : मुलुंड येथे राहणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.उन्हाळी सुट्टीनिमित्त उल्हासनगर येथे मामाच्या गावाला आलेल्या सहा वर्षीय सार्थकच्या जेवणात काहीतरी आढळल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या, त्याला कल्याण-कर्णिक रोड येथे असलेल्या रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला
Pune Rain : पुलाच्या दुरुस्तीकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी पुष्पा 2 स्टाईलमध्ये अनोखं आंदोलन
Pune Rain : विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागात अनेक वर्षांपासून पुलावर पाणी जमा होतं. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी मागणी केल्यानंतरही पालिकेने अजून त्यांची मागणी पूर्ण केली नाही, त्यामुळे सचिन भोसलेंनी पुष्पा स्टाईलमध्ये डान्स करून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या पुलावरून मोठमोठे ट्रक वगैरे जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाला फुटपाथ नाही. महिला, शाळकरी त्या पुलावरून जातात, त्यामुळे पालिकेने तातडीने लक्ष द्यावं, अशी मागणी आता होत आहे.