Maharashtra Live Updates : मोठी बातमी! आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
Maharashtra Live Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
जालन्यात राज्य जीएसटी विभागाकडून छापा; जीएसटी दडवल्याचा संशय
जालन्यात राज्य जीएसटी विभागाकडून छापा..
एस . जी . देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात तीन दिवसापासून पासून तपासणी.
मुंबईच्या जीएसटी पथकाकडून कंपनी चे ओनर यांच्या घरी आणि कार्यालयात कंपनी व्यवहाराच्या कागदपत्रांची पथाकडून कसून तपासणी.
कंपनीच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायाच्या आणि कंपनीला मिळालेल्या कंत्राटांच्या बिलांची तपासणी..
जीएसटी पथकाकडून कारवाई विषयी गोपनीयता..
या कंपनी कडून इतर बोगस फर्म सोबत व्यवहार करून जीएसटी दडवल्याचा संशय..
नातेवाईकांच्या सिमेंट कंपनी सोबत झालेल्या व्यवहारांच्या बिला बाबत देखील पथकाला संशय असल्याची माहिती...
नाशिक हिंसाचार प्रकरण; एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखसह एकूण सात जणांना नाशिक पोलिसांनी केले कोर्टात हजर
नाशिक हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून आणखी सात जणांना करण्यात आली अटक यामध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख याचाही समावेश आहे. नाशिक पोलिसांकडून आज सुट्टीच्या दिवशी या सात संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले आहे. काठे गल्ली हिंसाचार प्रकरणात एकूण आत्तापर्यंत नाशिक पोलिसांकडून 38 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.























