Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद आज बैठकीत उमटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केला आहे. तर भाजपनं ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र शिरसाटांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शहापूरचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा यांचा आज भाजपमध्ये प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यासहित पक्षप्रवेश
पांडुरंग बरोरा हे शहापूर चे माजी आमदार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून 2014 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्याने शिवसेनेत प्रवेश केला व शिवसेनेतून 2019 ला त्यांचा पराभव झाला, तर 2024 च्या विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षा कडून लढवली होती यावेळेस त्यांचा अवघ्या 1300 मताने निसटचा पराभव झाला, त्यांचे वडील महादू बरोरा हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कडून 4 टर्म शहापूर विधानसभेचे आमदार होते.
पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपा ची ताकत शहापूर विधानसभेत वाढणार आहे.
तमाशा कलावंताच्या टेम्पोला अपघात, सातारा- रत्नागिरी जिल्हा हद्दीवर अपघात, अपघातात 25 कलावंत जखमी
सातारा जिल्ह्यातील कराड- चिपळूण हायवेवर घाटमाथा गावच्या हद्दीत तमाशा कलावंतांच्या वाहनाला अपघात..
अपघातात 25 कलावंत जखमी झाले असुन त्यापैकी 5 कलावंत गंभीर जखमी झाले आहेत...
चिपळूणहुन कराडच्या दिशेने येताना टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती..
सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून जखमीना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे पहायला मिळाले..
अखेर खाजगी वाहनाने अपघातातील जखमींना हेळवाक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे...
घटनास्थळी घाटमाथा गावचे पोलीस पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक यांनी अपघात ग्रहस्थाना मदत केली आहे..
जालन्यात शेतकऱ्याचे स्मशानात चितेवर झोपून आंदोलन; सरसकट कर्जमाफीची मागणी
जालन्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीत चितेवर झोपून आंदोलन सुरू केलंय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत कारभारी म्हसलेकर या शेतकऱ्याने हे आंदोलन सुरू केलंय,दरम्यान आंदोलकांने यमाचा(मृत्यू देवतेचा) फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखं अनोख आंदोलन सुरू केलंय .
मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गोपनीय साक्षीदाराचा जबाब 'माझा'च्या हाती
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गोपनीय साक्षीदाराचा जबाब माझा च्या हाती
गोपनीय जबाबा नुसार सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे जिवलग मित्र
प्रतीक घुले हा रिक्षा चालवत असे तर सुधीर सांगळे याचे हॉटेल गंगा माऊली साखर कारखाना या ठिकाणी होते
तर टोळी प्रमुख सुदर्शन घुले हा साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करत होता
प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते. ते त्याला भावा म्हणूनच बोलवायचे..
या तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत होती
तिघेही वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचे काम करत होते. असा जबाब गोपनीय साक्षीदाराने तपास यंत्रणे कडे दिला आहे.
राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार; कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती
राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार - मंत्री लोढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तीन करार होणार
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती
प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीने आयटीआयमध्ये मिळणार प्रशिक्षण आणि रोजगार
द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरु करणार
स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी दे आसरा संस्थेसोबत तिसरा करार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास विभाग तीन करार करणार



















