एक्स्प्लोर
Jitendra Awhad FIR : विधान भवनाबाहेर मध्यरात्रीचा थरार; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नितीन देशमुख यांना विधान भवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांना गाडीतून अक्षरशः खेचून बाहेर काढल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना मध्यरात्री घडली. विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर एका व्यक्तीने म्हटले आहे की, "जर जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल होत असेल तर ती मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही सरकारच्या मर्जीनं चालणारं मन वाटतेय त्याप्रमाणे करणारं राज्य झालंय." विधान भवनाच्या परिसरात गुंड आणले गेले होते, असा आरोपही करण्यात आला आहे.
राजकारण
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
आणखी पाहा





















