Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा. लेटेस्ट अपडेटस् मिळवा एका क्लिकवर.
LIVE

Background
तुळशी तलाव काल सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला. पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये मिळून ९०.१६ टक्के जलसाठा उपलब्ध. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुळशी तलाव आज (दिनांक १६ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. ८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गत वर्षी (२०२४) दिनांक २० जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची मिळून एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये मिळून १,३०,४९८.१ कोटी लीटर (१३,०४,९८१ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ९०.१६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
माणगाव इंदापूर परिसरात वाहतूक कोंडी
3 दिवसांच्या सुट्टीवर आलेला पर्यटक परतीच्या दिशेला निघाल्यामुळे झाली आहे वाहतूक कोंडी
माणगाव रेल्वे स्थानक परीसर ते मुगवली या 4 किमी पर्यंत वाहतूक कोंडी
वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी पंकज कुमावत गजाआड करतील; ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास
Beed News : महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास बारकाईने एसआयटी मार्फत केला जात आहे.पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात स्थापन झालेले पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून आहे.पथकाकडून या प्रकरणाचा तपास बारकाईने केला जात आहे.
या तपासावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.पंकज कुमावत हे योग्य पद्धतीने तपास करून ते गुन्हेगारापर्यंत पोहचून त्यांना गजाआड करतील असा विश्वास ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केलाय.याचबरोबर मुंडे यांनी आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी देखील केली आहे.
























