Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: कोल्हापुरातील 'महादेवी हत्तीण' प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटलांसह कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज आणि गुजराती वर्ग नाराज आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी बैठक बोलावली. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
स्पा सेंटरवर नावाखाली शिवसेनेचा पदाधिकारी चालवायचा कुंटनखाना
Slug :- स्पा सेंटरवर नावाखाली शिवसेनेचा पदाधिकारी चालवायचा कुंटनखाना ,
भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जनावर गुन्हा दाखल , चार महिलांची सुटका
अँकर : नादेडमधील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा टू सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यावरून छापा टाकला असता असता स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचा दक्षिण युवा सेना जिल्हाध्यक्ष अमोद साबळे हा पदाधिकारी स्पा सेंटरचा मालक होता ... स्पा सेंटरच्या नावाखाली शिवसनेचा पदाधिकारी कुटंनखाना चालवायचा ..
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना अटक केली असून स्पा सेंटरचा मालक सेनेचा पदाधिकारी अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. स्पा सेंटर मधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी 16 हजार 560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत भाग्यनगर पोलीस दोन आरोपीचा शोध सुरु केला असून पुढील तपास सुरू आहे. ..
बाईट - सुनील तांबे पोलीस निरीक्षक
मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा
धाराशिव ब्रेकिंग -
मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा
अंतरवलीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल
एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत
आंतरवलीतील आया बहिणी बाळा झोपून, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत, एक एकाच्या डोक्यात 34 टाकेत
फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही
मराठ्यांच्या नादी लागायचं नाही गोडी गुलाबी ना तुम्हाला जे करायचं ते करायचं, त्यावेळेस घडलं ते घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही
ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे
आई बहिण पोरांवर हात पडला ना मराठे कोणत्याही टोकाला जातील, तुमच्यामुळे देशातल्या मोदी साहेबसहित सरकारला सुद्धा हादरा बसेल
मराठे बार बार मार खायला मोकळे नाहीत
मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिव मधून इशारा
29 ऑगस्टला मुंबई येथील आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांचा गाठीभेटी दौरा आज धाराशिवमध्ये
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्थानबद्ध केलं तर या प्रश्नावर जरांगे पाटलांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा
Byt मनोज जरांगे पाटील























