Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: आज मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत. तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील ५५६ रहिवाशांना आज चावी वाटप केले जाणार आहे. आज सकाळी अकरा वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
सरकार आणण्यात हिंदू समाजाच मोठा हात : नितेश राणे
सरकार आणण्यात हिंदू समाजाच मोठा हात.... नितेश राणे
हे सरकार हिंदू समाजानेच आणलं.. दुसरे कोणी मतदान केलं नाही, मोहल्लात फिरलात पण मतदान झाले नाही : नितेश राणे
हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं,त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी : नितेश राणे
लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत याला सक्षम उत्तर एकच आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करा....नितेश राणे
आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे : नितेश राणे
राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या निमित्ताने पाहिलं जातंय त्याला राखी संकलन हे उत्तर....नितेश राणे
हर्णे बंदराचा विकास करण्यासाठी 250 कोटींचा निधी खर्च करणार : नितेश राणे
हिंदू धर्माच्या दृष्टीने हिंदू म्हणून आपलं काम भक्कम.....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत, किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडतो आहे ही राज्यातील महिलांची भावना.
मुख्यमंत्री झाल्यावर जे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले यातून राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव जिहाद सारखे विषय करू शकत नाही ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात
अवती भवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे ऐकायला मिळते तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावं यांची जाणीव होते.
विकास होत राहील पण आपण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेऊ शकत नसून तर काय उपयोग ?
Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; चार महिन्यात 8,789 नागरिकांना चावे
Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यांत तब्बल 8,789 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कुत्रा पकड मोहीम आणि नियंत्रणासाठी महापालिकेने एका एजन्सीकडे हे काम दिले असून एका कुत्र्यमागे 989 रुपये खर्च केला जात असून वर्षांला 1,18,68,000 हजार रुपये खर्च केला जात आहे.
























