Live Updates: मंजूर केलेले शेतकरी भवन रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की; पणन मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा?
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि लाईव्ह घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव.

Background
मंजूर केलेले शेतकरी भवन रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
सहा जिल्ह्यात घोषित केलेले शेतकरी भवन महिन्याभरात रद्द
पणन मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा?
अमरावतीच्या चांदूर, नांदेडच्या बिलोली, कोल्हापूर येथील वडगाव, जालनातील वडीगोद्री, बीडमधील अंबाजोगाई, गडचिरोली मधील सिरोंचा येथील भवन रद्द
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भवन उभारण्यासाठी दिली होती प्रशासकीय मान्यता
राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार, अजित पवार गटात जाण्याचा तीन मे रोजीचा मुहुर्त ठरला
राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार , माजी मंत्री डॉ सतीश आण्णा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटात प्रवेश करण्याचा तीन मे रोजीचा मुहूर्त निश्चित झाला असल्याची माहिती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे
गेल्या अनेक दिवस पासून देवकर हे अजित दादा पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच सांगितले जात होते
मात्र अनेक वेळा प्रवेशाचा मुहूर्त टळला असल्याने, देवकारांच्या पदरी निराशा आली होती
आज जळगाव मधे राष्ट्रवादी अजित दादा गटाची महत्व पूर्ण बैठक पार पडली,
या बैठकीत गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील यांच्या सह अनेक प्रमुख कार्यकर्ते हे अजित दादा गटात प्रवेश करण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आल्याने,राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
पहलगाम हल्ल्यानंतर नालासोपाऱ्याच्या झोपडपट्टी, कामगार वसाहतींमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर
नालासोपारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून, त्याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत व्यापक ऑल आऊट कोबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबवण्यात आली होती.
या मोहिमेचा भाग म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी आणि कामगार वसाहतींमध्ये संशयित नागरिक आणि मजुरांविरोधात शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान जवळपास ४० ते ५० संशयित नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी संबंधितांकडून आधारकार्ड आणि वास्तव्याचे पुरावे जमा करून त्यांची पडताळणी सुरू केली आहे. या तपासात नागरिकांची ओळख, त्यांचे वास्तव आणि त्यांचा भारतात राहण्याचा कायदेशीर हक्क याची बारकाईने चौकशी करण्यात येणार आहे.
सध्या देशात दहशतवादी हालचाली वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही ही कारवाई केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी केलं आहे.
संपूर्ण शहरात सतर्कतेचा माहोल असून, पोलिसांची गस्त आणि तपासणी सुरूच राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.



















