(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित शाहांसोबतच्या बैठकीत फेक ट्वीटची चर्चा, एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केला तर बोम्मई म्हणाले, 'ते ट्वीट माझं नाही'...
महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra Karnataka Border Dispute) दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत संसद भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
Karnataka Maharashtra Issue: महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra Karnataka Border Dispute) दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीतील संसद भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai)आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू सांगितल्यानंतर अमित शाह यांनी दोन्ही राज्यांतील विरोधी पक्षांनाी राजकीय मतभेद बाजूला ठेवावा, राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करु नये. ट्विटरवरुन ज्यांनी या वादाला खतपाणी घातलंय, त्यांचा शोध घेण्यात येईल, या प्रकरणातील फेक ट्विटर अकाउंटचा शोध घेण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल, असं अमित शाह म्हणाले. फेक ट्वीटचा मुद्दा या बैठकीत गाजला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने एका फिरणाऱ्या ट्वीटवर महाराष्ट्रासंबंधी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते अकाउंट आपलं नव्हतं अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. तसेच यासंबंधी तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते बोम्मई...
असं असलं तरी बोम्मई यांच्या एका वक्तव्यावरुन महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली होती ते ट्वीट अद्यापही बोम्मई यांच्या ओरिजिनल ट्विटर हॅंन्डलवर आहे. कर्नाटकच्या महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह गाव मिळवण्याचा प्रयत्न करु असं म्हटलं, असं फडणवीस म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत. कर्नाटकची एक इंच भूमी कोणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्नाटकची भूमी, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये भूमी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात सामील व्हावेत, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहे. परंतु आतापर्यंत त्यांना यश आले नाही. यापुढे ते होणार नाही. कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं बोम्मईंनी म्हटलं होतं. बोम्मईंच्या या ट्वीटनंतर सोलापूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला गेला होता.
ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇದ್ರ ಫಡ್ನವಿಸ್ ಅವರು ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದು, ಅವರ ಕನಸು ಎಂದೂ ನನಸಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾಡಿನ ನೆಲ, ಜಲ, ಗಡಿ ರಕ್ಷಣೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕಟಿ ಬದ್ಧವಾಗಿದೆ.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
1/3
बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी गेले होते. तिथं पंधरा ते वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित विषयावर खलबतं झाल्याची शक्यता आहे.
ही बातमी देखील वाचा