एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग गेले बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली; फडणवीस यांचा हल्लाबोल

या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले असं बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (FDI) महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्राने (Maharashtra) इतर राज्यांना मागे टाकलं. या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले असं बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. उद्योग बाहेरच्या राज्यात गेले आहे. त्याचा राज्याला फटका आहे. म्हणून श्वेतपत्रिका काढा त्यात परकीय गुंतवणूक वाढली तर अभिनंदन करु अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे.

गुजरात, कर्नाटकला मागे टाकून महाराष्ट्र पुन्हा नंबर वन

2020 ते 2022 या काळात महाराष्ट्राचा क्रमांक घसरला होता. मात्र 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली. 2021-22 च्या तुलनेत हा आकडा 4 हजार कोटींनी अधिक आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने नुकतीच परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून पहिला क्रमांक पुन्हा पटकावल्याचं स्पष्ट झालं आहे.

'उद्योग गेले हे बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली'

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याने आज केंद्र सरकार आणि खासगी कंपन्यांसोबत पंप स्टोअरेज संदर्भात 13 हजार 500  मेगावॅटचे करार केले. याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 30 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. पंप स्टोअरेज हा जगात सर्वात अपारंपरिक स्त्रोत म्हणून स्वीकारला आहे. हा सर्वात मोठा करार आहे. कालच एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. 2020-21 मध्ये गुजरात तर 2021-22 मध्ये कर्नाटक नंबर वनवर गेला. आता महाराष्ट्र नंबर वनवर गेला आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले हे बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत.

VIDEO : Devendra Fadnavis Full PC : परदेशी गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र पहिला : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली?

देशात गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2023 या काळात महाराष्ट्रात चार लाख सात हजार कोटींची एकत्रित गुंतवणूक झाली. याच काळात कर्नाटकात 24 टक्के, गुजरातमध्ये 17 टक्के तर 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो. 

श्वेतपत्रिका काढा, परकीय गुंतवणूक वाढलेली दिसली तर अभिनंदन करु : अजित पवार

दुसरीकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सरकारचा नंबर वनचा दावा मान्य नाही. राज्यातले उद्योग बाहेरच्या राज्यात गेले. त्यामुळे रोजगार बुडाला. राज्याला फटका बसला. आधी उद्योगांवरची श्वेतपत्रिका काढा, त्यात परकीय गुंतवणूक वाढलेली दिसली तरच सरकारचे अभिनंदन करु, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमधला दावा आणि प्रतिदाव्याचा कलगीतुरा रंगणारच आहे. हेही खरं आहे की महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योग जगतात प्राधान्य असलेलं राज्य होतं, आहे. पण याच राज्यात उद्योजकांना खंडणीखोरी, कंत्राट मागणारे, महागडी वीज, लालफितीचा त्रास आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूक वाढली असं जरी दिसलं तरी प्रत्यक्षात ती गुंतवणूक अस्तित्वात आली का आणि रोजगार मिळाला का याचं प्रमाण सुद्धा तपासून बघायला हवं. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Sanjay Raut: अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिले, देवेंद्रजी आधी त्यावर बोला; मुख्यमंत्र्यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची उपहासात्मक टीका
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिले, देवेंद्रजी आधी त्यावर बोला; मुख्यमंत्र्यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची उपहासात्मक टीका
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget