IAS Transfer : संजय कोलटे साखर आयुक्त तर शेखर सिंह हे कुंभमेळा आयुक्त, सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून रत्नागिरी, नाशिक, जळगाव, पुणे जिल्ह्यांतील प्रशासनात फेरबदल करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS officers Transfers) केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon) आणि पुणे (Pune) जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कोलटे यांची पुणे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ही बदली यादी (transfer list) मंगळवारी जारी केली आहे.
Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
देवेंद्र सिंह मुंबईत बदली
देवेंद्र सिंह (Devendra Singh), जे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी (District Collector) म्हणून कार्यरत होते, यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव (Member Secretary, Maharashtra Pollution Control Board, Mumbai) म्हणून करण्यात आली आहे.
शेखर सिंह होणार कुंभमेळा आयुक्त
शेखर सिंह (Shekhar Singh), सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त (Municipal Commissioner, PCMC), यांची बदली कुंभमेळा आयुक्त, नाशिक (Commissioner, Kumbh Mela Nashik) म्हणून करण्यात आली आहे.
नाशिकच्या महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात नवीन आयुक्त
जलज शर्मा (Jalaj Sharma), जे नाशिकचे जिल्हाधिकारी होते, यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (Metropolitan Commissioner, Nashik Metropolitan Region Development Authority) म्हणून झाली आहे.
आयुष प्रसाद नाशिकचे जिल्हाधिकारी
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी (District Collector, Nashik) म्हणून करण्यात आली आहे.
रोहन घुघे जळगावचे नवीन जिल्हाधिकारी
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO Zilla Parishad Thane) रोहन घुघे (Rohan Ghughe) यांची नियुक्ती जळगाव जिल्हाधिकारी (District Collector, Jalgaon) म्हणून करण्यात आली आहे.
संजय कोलटे यांची नियुक्ती साखर आयुक्तपदी
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक (Shivshahi Rehabilitation Project, Mumbai) संजय कोलटे (Sanjay Kolte) यांची बदली साखर आयुक्त, पुणे (Sugar Commissioner, Pune) या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
मनोज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
मनोज जिंदल (Manoj Jindal), जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC, Mumbai) चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Joint Managing Director) होते, यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी (District Collector, Ratnagiri) म्हणून झाली आहे.
ही बातमी वाचा:
























