Maharashtra HSC Result 2025: बारावीचा अभ्यासक्रम बदलणार, निकालाचा टक्का घसरला, 124 केंद्रावर गैरप्रकार, 12 वी निकालाची वैशिष्ट्ये!
Maharashtra HSC Result 2025: आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मुलींनी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त आला आहे.

पुणे: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज(सोमवारी,ता-5) (Maharashtra HSC Result 2025) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाला पाहता येणार आहेत. सध्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शरद गोसावी यांनी अनेक गोष्टींवरती भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी निकालाचा टक्का यावेळी 1.49 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर 2027-28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. या परिक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र, तरी देखील 124 केंद्रावर गैरप्रकार झाले आहेत त्याची तपासणी त्रुटी आढळल्यास ते परिक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे.(Maharashtra HSC Result 2025)
यंदा निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के आहे.
निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी झाला आहे.
2027-28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार
3373 केंद्रांपैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी यांनी दिली आहे. 2027-28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 124 केंद्रांची चौकशी करून कारवाई होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तर पुणे 42, नागपूर 33, छत्रपती संभाजीनगर 214, मुंबई 9, कोल्हापूर 7, अमरावती 17, नाशिक 12, लातूर 37, एकूण 374 कॉपी प्रकार उघडकीस आले असल्याचंही यावेळी शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.(Maharashtra HSC Result 2025)
राज्यात मुलींनी बाजी मारली
बारावी परीक्षेत राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. 8,10,348 मुले 6,94,652 मुली 37 ट्रान्सजेंडर एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
यंदा एकाही विद्यार्थ्याला 100 टक्के गुण नाहीत
पत्रकार परिषदेत माहिती देताना शरद गोसावी यांनी सांगितलं की, यंदा एकाही विद्यार्थ्याला 100% गुण मिळालेले नाहीत. पण, 1929 कॉलेजचा निकाल 100 % लागला आहे. त्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.
विभाग निहाय निकाल
पुणे - 91.32
नागपूर - 90.52 टक्के
संभाजी नगर - 92.24 टक्के
मुंबई - 92.93 टक्के
कोल्हापूर - 93.64 टक्के
अमरावती - 91.43 टक्के
नाशिक - 91. 31 टक्के
लातूर - 89.46 टक्के
कोकण - 96.74 टक्के
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?
विज्ञान- 97.35 टक्के
कला- 80.52 टक्के
वाणिज्य- 92.68
व्यवसाय अभ्यासक्रम- 83.03 टक्के
आयटीआय- 82.03 टक्के
खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील
परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय, विद्यार्थी इतर अधिकृत पोर्टलवर देखील त्यांचे निकाल तपासू शकतील.
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
निकाल कसा तपासायचा
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा
मंडळाच्या वेबसाईटशिवाय निकाल कुठं पाहावा?
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























