HSC Exam Result 2025 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के
HSC Result 2025 Live Maharashtra : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ऑनलाईन निकालासाठी mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org/ भेट द्या

Background
HSC Result 2025 : निकाल लागला परंतु कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत; वैभवी देशमुखने व्यक्त केली खंत
बीड : आज बारावीचा निकाल लागला. मला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत. माझी नीटची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे. त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. परंतु मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता. त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला देखील अटक केली जावी, अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे.
Dharashiv HSC result : बारावीच्या निकालात लातूर विभागात धाराशिव जिल्हा अव्वल स्थानी
धाराशिव जिल्ह्याचा 92.32% निकाल, लातूर विभागात पहिला क्रमांक
राज्यभरातील आज बारावीचा निकाल जाहीर झाला. लातूर विभागाचा निकाल 89.46% एवढा आला आहे. तर लातूर विभाघात धाराशिव जिल्हा अव्वल स्थानी असून धाराशिवचा निकाल हा 92.32% एवढा आहे. तर 90.82% आणि 86.68% निकालासह नांदेड दुसऱ्या तर लातूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. लातूर विभागातून 90277 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 80 हजार 770 विद्यार्थी पास झाले आहेत
























