(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 8th May : दुपारच्या बातम्यांमध्ये वाचा राज्यातील प्रमुख घडामोडी एका क्लिकवर
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी, 'सामना'तून टीका; पवारांचंही उत्तर
ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Saamana) शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. "शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण तरीही पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत," असं सामनाच्या अग्रलेखात (Editorial) लिहिण्यात आलं आहे. शरद पवार यांचं आत्मचित्र लोक माझे सांगाती (Lok Maze Sangati) या आत्मचरित्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर परखड शब्दात टीका करण्यात आली आहे. त्याचीच ही परतफेड आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. वाचा सविस्तर
राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब
राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता (Missing) होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश आहे. तर जानेवारी महिन्यात 1600 आणि फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर
पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा; राज ठाकरेंचं सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन
"कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा," असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे. शिवाय निवडून आल्यावर या उमेदवाराने मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवरील अन्याय याविरोधात विधानसभेत वाचा फोडायला हवी, असंही त्यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. वाचा सविस्तर
राजकीय वक्तव्यांनी वाढवला सत्तासंघर्षाच्या निकालाचा सस्पेन्स
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालाची वेळ आता जवळ येत चालली आहे. पुढचे तीन चार दिवस त्यादृष्टीनं निर्णायक असणार आहेत. त्यात राजकीय वक्तव्यांनी या निकालाचा सस्पेन्स आणखी वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जवळ येत चाललाय आणि काही गूढ, सांकेतिक वक्तव्ये वाढू लागली आहेत. वाचा सविस्तर
जळगावमध्ये तरुणीचा तरुणावर भररस्त्यात चाकू हल्ला, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
तरुण तरुणीचा भांडणाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला असून या व्हिडिओत तरुणीने तरुणावर चाकू हल्ला जखमी (knife Attack) केल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ जळगाव शहरातही असून अद्याप या व्हिडीओ संदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे तरुण तरुणी नेमके कोण आणि कशावरून वाद सुरु आहे, याबाबत माहिती नाही.