(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 7th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय
शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. न कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आले. (वाचा सविस्तर)
विदर्भातील उन्हाळ्याने तीस वर्षाचा विक्रम मोडला, यंदाचा उन्हाळा ठरला कमी ‘ताप’दायक
प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या शहरात तापमानाचा उच्चांक गाठतात. दरवर्षी गेल्या वर्षीच्या तापमानान एक दोन अंश सेल्सिअसने वाढ नोंदवलीले, असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्याने मागील तीस वर्षाचा विक्रम मोडला आहे. विदर्भातील या वर्षीचा उन्हाळा हा सर्वात थंड उन्हाळा म्हणून नोंदवला गेला आहे. (वाचा सविस्तर)
महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रभारी मिळणार? निवडणुकीच्या महत्वाच्या वर्षात कुणाला मिळणार जबाबदारी?
निवडणुकीच्या वर्षात कोण असणार महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रभारी (Maharashtra Congress In-Charge), याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) हे सध्या कर्नाटकमध्ये (Karnataka) कॅबिनेट मंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी लवकरच नवा प्रभारी नेमला जाण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)
दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून; बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे. (वाचा सविस्तर)
सायबर चोरांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? बनावट फेसबुक अकाऊंट काढून करत आहेत मेसेज
पुण्यात सायबर गुन्ह्यांचा धुमाकूळ काही संपायचं नाव घेत नाही आहे. राजकारण्यांच्या नावाने पैसे उकळून आणि त्यांना धमक्या देऊन झाल्यानंतर आता याबर चोरांनी पुन्हा एकदा थेट पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरुच असल्याचं समोर आलं आहे. (वाचा सविस्तर)