एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

Kolhapur News: शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग दिसून आला. दरम्यान कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. 

कोल्हापूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी बळाचा आणि संयमाचा उत्कृष्टपणे वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर दबा धरुन बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी रस्त्यावर

दुसरीकडे कोल्हापुरातील तणावाची स्थिती लक्षात घेता राज्याच्या गृह विभागाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी हे स्वतः शिवाजी चौकमध्ये रस्त्यावर उतरले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. जे पोलीस रस्त्यावर होते त्यांनी परिणामकारकपणे कारवाई केली आहे. यासंदर्भात आतापर्यंत सहा जणांना अटक माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जे रस्त्यावर उतरले ते कोण आहेत याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय म्हणाले?

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त स्टेटस लावणाऱ्यांपैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश देतानाच कुठल्याही प्रकारचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही अशी माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा केला. तसेच संबंधितांना आदेश देण्यात आल्याचे सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Embed widget