एक्स्प्लोर

Maharashtra Headlines 3rd May : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...  

Sharad Pawar Retirement: शरद पवारांनी निर्णय कायम ठेवला तर, राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? 'ही' दोन नावं चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अन्य कुणाकुणाची पदं बदलणार, नक्की कुणाला महत्त्वाची जबाबदारी मिळणार तर कुणाला अडगळीत टाकलं जाणार, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण जो कुणी नवा किंवा नवी अध्यक्ष होईल, त्या व्यक्तीकडून पक्षात मोठे बदल करणं अपेक्षित असेल. कारण लोकसभा निवडणुकीला एक वर्षंही राहिलेलं नाही. विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर आली आहे. तर चारच महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते आणि किती खोलवर बदल होतात ते आता पाहावं लागेल. वाचा सविस्तर

रस्ते वेगाने बांधण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. आहेत. राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर देण्यात येणार आहे.   परिणामी खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होण्यास मदत होणार आहे   वाचा सविस्तर 

शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय; भाजप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

 राष्ट्रवादीचे  (Nationalist Congress Party-NCP ) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष राजकीय गणितं सोडवण्यात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय म्हणजे. राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणं घाई होईल, असं फडणवीस म्हणाले. वाचा सविस्तर 

काकानं जीवाचं रान केलं, पण... पुतणीला वाचवण्याच्या नादात काकाचाही विहिरीत बुडून मृत्यू

विहिरीत  पडलेल्या आपल्या पुतणीला वाचविण्यास गेलेल्या काकाला पुतणीने पाण्यामध्ये घट्ट मिठी मारल्याने काका-पुतणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ (Sangli News) तालुक्यातील  अग्रण धुळगाव गावात  घडली आहे. मनोज भास्कर शेसवरे (वय 43) आणि सौंदर्या वैभव शेसवरे अशी मृतांची नावे आहेत.  कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.  काका-पुतणीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. वाचा सविस्तर 

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधील वेश्याव्यावसायाचा पर्दाफाश; 3 दलाल अटकेत 

मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.  त्यातच पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये  सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणून कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमधून 3 दलालांना अटक केली आहे.  वाचा सविस्तर 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget