Maharashtra Headlines 19th May : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मुंबई महापालिका निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाहीत
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे बीएमसी महापालिका निवडणुका तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील बदलाबाबत बीएमसी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर
बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील पहिलं यश, निवडणुकीतील राज्यातील पहिला उमेदवार विजयी
राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (बीआरएस) अखेर राज्यात पहिलं यश मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचं निकाल आज आला असून, गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असे बीआरएसच्या विजयी उमेदवाराचं नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती. वाचा सविस्तर
राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर; नवनिर्माणासाठी मनसेची नवी रणनीती काय?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले असून प्रत्येक पक्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोटबांधणी करताना दिसून येत आहे. दुसरीकडे मनसेचे इंजिन देखील रुळावर येण्यासाठी चांगलाच जोर देत आहे. एकीकडे मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेने पुन्हा एकदा नवनिर्माण करण्याचे ठरवल्याचे मागील काही बैठकांवरुन दिसून येत आहे. याच नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोश भरण्यासाठी खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. वाचा सविस्तर
दंगली सरकार प्रायोजित आहेत का? : अंबादास दानवेंचा सवाल
राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दंगलग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आज अकोल्यात आले आहेत. यावेळी दानवेंनी दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाडच्या कुटुंबियांची भेट घेतली. अकोल्याची दंगल हे राज्य सरकार आणि गृहविभागाचं अपयश असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. दंगली सरकार प्रायोजित आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला. वाचा सविस्तर
'पॉवर ग्रीड'च्या वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण; पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (18 मे) रात्री 7: 10 वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे 1 वाजेपासून सकाळी 8:55 वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. वाचा सविस्तर