ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर 1, महायुतीला मतदारांचा कौल; जाणून घ्या सकाळी 11 पर्यंत कोणाच्या पदरात किती यश?
ग्रामपंचायतींमधील वर्चस्वाच्या लढाईकडे नजर टाकली तर आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे.
मुंबई : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे.जसजसे गावागावात जल्लोष सुरु झाला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या निकालाचे कल पाहता सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय. तर 2 नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तीन नंबरला शिंदे उद्धव ठाकरे गट आहे आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. प्रत्येक पक्षानं आपआपल्या विजयाचे वेगवेगळे आकडे सांगून दावे केलेत.
ग्रामपंचायतींमधील वर्चस्वाच्या लढाईकडे नजर टाकली तर आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. भाजपला 113, शिंदे 78, अजित पवार गट 97, काँग्रेस 53, शरद पवार गट 40 ठाकरे गट 42, इतर 58 जागा मिळाल्या आहेत.
मावळ तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौल
मावळ तालुक्यातील डोने गावात भाजपची सत्ता तर दिवड गावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौल मिळाला आहे. डोने गावात भाजपचे हृषीकेश खारेक सरपंच आणि दिवड गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश राजीवडे सरपंच झाले.
दक्षिण सोलापूरमध्ये भाजपची सत्ता
संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसची 25 वर्षांपासूनची सत्ता उलथून टाकत भाजपने सरशी मारली आहे. कासेगावातील 11 पैकी 9 जागांवर भाजपचा दणदणीत विजय तर सरपंच पदावर ही भाजप आहे. काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळाला आहे.
नागपूर- कामठी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाला आहे. तर सरपंच पदी ही भाजपच्या सुजाता सुरेश पाटील सरपंच भाजप विजयी झाला आहे. कामठी तालुका कवठामध्ये भाजपची सत्ता आहे. सरपंच पदी निलेश डफ्रे यांचा विजय झाला आहे. कामठी तालुक्यातील वारेगाव येथे काँग्रेसचा बहुमत सरपंच पदी ही काँग्रेसच्या रत्नबाई उईके यांचा विजय झाला आहे.
मिरज हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम
सांगली - मिरज हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम आहे.
बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अजित पवारांकडे
बारामती तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आले आहेत. सर्व 12 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेले आहेत. भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ , आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंज, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी