उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?
LIVE
![उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष? उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?](https://cdn.abplive.com/LiveBlogImage/2019/11/33a9b1aae3b91725af6b00fa980c6ff1.jpg)
Background
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत.
वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार सकाळीच विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांची हॉटेल लेमन ट्रीमधून तर ग्रॅण्ड हयात आणि सोफीटेल हॉटेलमधून राष्ट्रवादी आमदारांची बस निघाली. याशिवाय ग्रॅण्ड हयातमध्ये असलेले काँग्रेस आमदारही विधानभवनाला पोहोचणार आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही विधानभवनात उपस्थित असतील.
विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी आज महाराष्ट्र विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. यानंतर बहुमत चाचणी होणार आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची घोषणा
ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावची घोषणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिक वेळ न दवडता महाविकासआघाडीकडून एकमताने उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
![](https://abplive-mum.s3.ap-south-1.amazonaws.com/LiveBlogImage/2019/11/99d0ccddf4dcbd3e50fe2827778d8602.jpeg)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)