Sanjay Raut : भगतसिंह कोश्यारींनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, नवीन राज्यपाल बैस की बायस...वाचा नेमकं काय म्हणाले राऊत
Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut : महाराष्ट्रात प्रथमच राज्यपालांच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्याचे राऊत म्हणाले. राज्यपाल हे गृह मंत्रालयाच्या दबावाखाली काम करत होते असेही राऊत म्हणाले. आता नवीन राज्यपाल आले आहेत. ते बैस आहेत की बायस ते मला माहित नसल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari : कोश्यारी यांच्या विरोधात जनतेत मोठा संताप
भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्याच्या जनतेने, राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. ते दबावाखाली काम करत होते. व्यक्ती वाईट नसते. पण दबावाखाली काम करावं लागलं की व्यक्ती भगतसिंह कोश्यारी होते असे राऊत म्हणाले. कोश्यारी यांच्या विरोधात जनतेत मोठा संताप होता असेही राऊत म्हणाले. संजय राऊत सकाळी आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Sanjay Raut on Ramesh Bais : नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं
आता राज्याला नवीन राज्यपाल रमेश बैस मिळाले आहेत. त्यांच्या नावात बैस आहे की बायस आहे ते मला माहित नाही. त्यांनी जर घटनेनुसार काम केलं तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांचे स्वागत होईल. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य लाभेल असे राऊत म्हणाले. मी त्यांनी व्यक्तीश: ओळखतो. ते अटलजींच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. ते अनेक वर्ष खासदार होते. त्यामुळं नवीन राज्यापालांचे आम्ही स्वागत करतो. पण राज्यपाल बदलाची मागणी ही अनेक महिन्यांपासून सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई यांच्या संदर्भात राज्यपालांनी जी वक्तव्य केली, त्यावेळीच त्यांना महाराष्ट्रातून हटवणे गरजेचं होतं, पण केंद्र सरकारनं ते केलं नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
देर आए दुरुस्त आए, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर झाला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर केल्यानंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. देर आए दुरुस्त आए अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: